Blood Cancer Symptoms : त्वचेचा रंग बदलत असेल तर सावधान; असू शकतो ब्लड कॅन्सरचा धोका, 'असे' ओळखा
Blood Cancer Symptoms : अनेकांना माहीत नसेल पण ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे त्वचेवर दिसतात. पण ती ओळखणे फार कठीण आहे.
Blood Cancer Symptoms : ब्लड कॅन्सर (Blood Cancer) हा खूप धोकादायक आजार आहे. ब्लड कॅन्सरला 'ल्युकेमिया' असंही म्हणतात. ब्लड कॅन्सर बोन मॅरोमध्ये सुरू होतो आणि नंतर हळूहळू हा संसर्ग रक्तात पसरतो. ब्लड कॅन्सर लवकर आढळून आला तर जीव सहज वाचू शकतो. मात्र, शेवटच्या टप्प्यात आढळून आल्यास जीव वाचवणं फार कठीण आहे. अनेकांना माहीत नसेल पण ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे त्वचेवर दिसतात. पण ती ओळखणे फार कठीण आहे. ब्लड कॅन्सरचा लाल रक्तपेशींवर खूप परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची निर्मिती थांबते. ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला रुग्णाच्या त्वचेवर अनेक लक्षणे दिसतात. ज्याकडे दुर्लक्ष करणं फार कठीण आहे. म्हणून, वेळेवर निदान आणि उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे.
ब्लड कॅन्सर आणि 'ल्युकेमिया'
ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया झाल्यास रुग्णाच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. यामध्ये शरीराचा रंग पिवळा होऊ लागतो. एवढेच नाही तर, डोळेही पिवळे पडू लागतात. जर तुम्हाला ब्लड कॅन्सरने ग्रासले असेल तर त्वचेवर थोडीशी दुखापत झाली तरी जास्त रक्तस्त्राव होतो. ब्लड कॅन्सरमुळे ल्युकेमिया कटिस नावाचा आजार होतो. यामुळे, चेहरा, हात आणि शरीराच्या इतर भागांवर पुरळ आणि निळ्या गाठी तसेच पॅच दिसू शकतात. खरंतर, रुग्णाच्या हात, पाय, बोटं आणि त्वचेवर लाल डाग आणि पुरळ उठतात. चेहऱ्यावर लाल डाग आणि पुरळ उठणे ही ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमियाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
ब्लड कॅन्सर टाळण्यासाठी उपाय
जर तुम्हाला ब्लड कॅन्सर टाळायचा असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. यासाठी निरोगी आहार गरजेचा आहे. ब्लड कॅन्सर तपासण्यासाठी डॉक्टर सीबीसी टेस्ट म्हणजेच संपूर्ण ब्लड काउंट टेस्ट करतात. जेव्हा कर्करोगाच्या रुग्णाची तपासणी केली जाते तेव्हा बायोप्सी केली जाते. यामध्ये कर्करोग ओळखता येतो. चांगली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे तुम्ही हा आजार टाळू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )