रक्त शु्द्ध करण्यासाठी कारले उपयुक्त, वाचा कारले खाण्याचे फायदे
कारले (Bitter Gourd) हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातो. नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करण्यासाठी कारले उपयुक्त ठरते.
Bitter Gourd : कारले (Bitter Gourd) हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातो. नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करण्यासाठी कारले उपयुक्त ठरते. आयुर्वेदातही कारल्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मात्र. कारल्याची चव ही कडू असल्यामुळं अनेकजण ते खाणे टाळतात. कडूपणामुळं अनेकांना ते खायला आवडत नाही. अशा कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीनं कारले खाण्याचे अनेक फायदेही आहेत. पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती
कारले खाण्याचे फायदे (Benefits of eating Bitter Gourd)
1. कारल्यामुळे रक्त शुद्ध होते
रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये अँटी-ऑक्सिडंट घटक देखील आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
2. मधुमेहासाठी रामबाण उपाय
कारल्यामध्ये असलेले चरेंटिन तत्व शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. शिवाय, कारल्यामध्ये पॉलिपेप्टाइड मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिनसारखे काम करते.
3.रक्तदाबासाठीही कारले फायदेशीर
कारल्यामध्ये असलेले पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते. एवढेच नाही तर ते खाल्ल्याने न्यूरोट्रांसमिशनची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे कडू एकंदर आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
कारल्याचा कडूपणा दूर करण्याचे उपाय
1. मीठ मिसळा आणि थोडा वेळ ठेवा
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी ते कापून त्यावर मीठ लावा. साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर कारल्यातून येणारे पाणी फेकून द्या. त्यामुळं त्याचा कडूपणा बराच कमी होतो.
2. तळण्याआधी कारले मध किंवा साखरेच्या पाण्यात टाका
कारले तळण्याआधी एका भांड्यात पाण्यात आवश्यकतेनुसार मध किंवा साखर घालून त्यात टाका. यानंतर, जर तुम्ही कारले तळून खाल्ले तर कदाचित मध किंवा साखरेमुळे त्याचा कडूपणा कमी होतो.
3. कारले दह्यात ठेवा
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले काही वेळ दह्यात भिजत ठेवा. काही वेळाने कारले पाण्याने नीट धुवून घ्या.
4. नारळाच्या पाण्याने कारल्याचा कडूपणा दूर होईल
नारळाचे पाणी वापरूनही कारल्याचा कडूपणा कमी करता येतो. कारल्याला 15 ते 20 मिनिटे नारळाच्या पाण्यात ठेवा. काही वेळाने ते चांगले धुवून नंतर भाजी करा. त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल.
महत्त्वाच्या बातम्या:
Success Story :भंडाऱ्यात बागायती शेतीतून शेतकऱ्यानं साधली आर्थिक प्रगती; कारले, चवळी शेंग,काटवलच्या उत्पन्नातून कमावतोय लाखो रुपये
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )