एक्स्प्लोर

Skin Care Mistake: एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्स वापरत असाल तर, वेळीच सावध व्हा, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल!

Skin Care Mistake: अनेक मुली आणि महिला स्वतःला सुंदर बनवण्यासाठी मेकअप लावतात. आजकाल मोठ्या ब्रँड्सचे मेकअप प्रोडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत.

Skin Care Mistake: चेहऱ्याचं (Skin Care Tips) आणि केसांचं सौंदर्य (Hair Care Tips) वाढवण्यासाठी हल्ली बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. प्रत्येक मिनिटाला बाजारात एखादं नवं प्रोडक्ट पाऊल ठेवतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रोडक्ट्स आणि टेलिव्हिजन, सोशल मीडियावर सातत्यानं सुरू असलेल्या जाहिरातींचा भडिमार आपल्यावर सातत्यानं होत असतो. पण, हे प्रोडक्ट्स प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरतील असं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या प्रोडक्ट्सची एक एक्सपायरी डेट असते, त्यामुळे यांचा वापर करताना ती तारीख पाहून त्यानंतरच वापर करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. एक्सपायरी डेट निघून गेलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत असाल, तर ते तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. 

अनेक मुली आणि महिला स्वतःला सुंदर बनवण्यासाठी मेकअप लावतात. आजकाल मोठ्या ब्रँड्सचे मेकअप प्रोडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक स्त्रिया ते विकत घेतात आणि वापरतात. अनेक वेळा घरात अनेक मेकअप प्रोडक्ट्स असतात, जी तशीच पडून राहतात आणि त्यांची एक्सपायरी डेट निघून जाते. अशा प्रोडक्ट्सचा वापर केल्यानं तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य बिघडू शकतं. जर तुम्ही कालबाह्य झालेले मेकअप प्रोडक्ट्स जाणूनबुजून किंवा नकळत वापरत असाल, तर तुमचं सौंदर्य नक्कीच बिघडून शकतं. अशा एक्सपायरी झालेल्या प्रोडक्ट्समुळे त्वचेवर दुष्परिणाम दिसू शकतात. 

 एक्सपायरी निघून गेलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करणं त्वचेसाठी घातक 

1. त्वचेला जळजळ (Skin Irritation)

जुनी, एक्सपायर झालेल्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करणं त्वचेच्या आरोग्यासाठी घातक ठरतं. मेकअप प्रोडक्ट्सची एक्सपायरी निघून गेल्यानंतर, त्यात काही रासायनिक बदल घडून येतात. जे त्वचेवर लावल्यानं जळजळ, रॅशेज किंवा ड्रायनेसची समस्या उद्भवू शकते. तसेच, मेकअप प्रोडक्ट्स एक्सपायर्ड झाल्यानंतर त्यामध्ये नवे आणि त्वचेसाठी हानिकारक बॅक्टेरिया तयार होण्याचा धोकाही अधिक असतो. 

2. स्किन अॅलर्जी (Skin Allergies)

एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट वापरल्यानं स्किनवर अॅलर्जी होऊ शकते. अशा प्रोडक्ट्सचा वापर केल्यानं त्वचेवर सूज, जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्यांकडे दुर्लक्ष करणं फारच हानिकारक ठरू शकतं. अशा प्रोडक्ट्सचा वापर केल्यानं अनेक नवे प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. 

3. डोळ्यांना इन्फेक्शनचा धोका (Risk Of Eye Infection)

एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्स आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतात. जर मस्करा किंवा आयलायनर एक्सपायर्ड झालं असेल आणि तुम्ही ते डोळ्यांत लावलं, तर डोळ्यांना संसर्गाचा आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह होण्याचा धोका असू शकतो. एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्समध्ये बॅक्टेरिया वाढल्यानं डोळ्यांना इतरही अनेक प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. त्यामुळे एक्सपायर्ड झालेला मस्करा किंवा आयलायनर वापरू नका. 

4. त्वचारोगांचा धोका अधिक (Risk Of Skin Diseases)

एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्सचा वापर वारंवार केल्यानं त्वचेच्या समस्य उद्भवू शकतात. त्यामुळे त्वचारोग उद्भवू शकतात आणि त्वचेचा पोतही बिघडू शकतो. जर त्वचा संवेदनशील असेल तर त्यामुळे एक्जिमा देखील होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रोडक्ट्सचा वापर करणं कटाक्षानं टाळा. 

एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्सपासून दूर राहा, पण कसं? काय काळजी घ्याल? 

1. मेकअप प्रोडक्ट्स खरेदी करण्यापूर्वी, त्यावरचं लेबल तपासा. त्यावर लिहिलेलं 'use by' तपासायला विसरू नका.
2. हिट आणि आर्द्रता दोन्ही मेकअपसाठी योग्य नाही. तुमची उत्पादनं सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवणं चांगलं.
3. मेकअप ब्रश नियमितपणे धुवा आणि स्वच्छ ठेवा. 
4. मेकअप प्रोडक्ट्स एक्सपायर्ड झाली आहेत की, नाही हे तुम्हाला माहिती नसल्यास, तुम्ही त्यांचा गंध घेऊ शकता. मेकअर प्रोडक्ट्समधून दुर्गंधी येत असेल तर समजावं की ते एक्सपायर्ड  झाले आहे.

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Thick hair After The Age Of 50 : वयाच्या पन्नाशीत काळ्या कुळकुळीत अन् लांबसडक केसांसाठी फक्त 'या' 5 टिप्स फॉलो करा!

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget