(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदीक उपाय, काय खाल्ल्यानं कमी होईल वजन, जाणून घ्या
Weight Loss In Ayurveda : जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर आयुर्वेदिक उपाय करुन तुम्ही सहज वजन कमी करू शकता.
Home Remedies For Fat Reduce : सध्या वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे वेळीच वजन नियंत्रित करणं गरजेच आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, हे फार चुकीचं आहे. आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास अनेक आजारांना तोंड द्यावं लागू शकतं. वजन कमी करण्यासाठी काही जण व्यायाम तर काही जण डायटींग करतात. पण तुम्हाला आयुर्वेदातील वजन कमी करण्यासाठीचे उपाय माहित आहे का? नसतील तर जाणून घ्या. आयुर्वेदामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचं सेवन केल्याने तुमचं वजन नियंत्रणात राहील.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात या वस्तूंचा समावेश करा.
1. वजन कमी करण्यासाठी, आयुर्वेदामध्ये हळद, आलं आणि मधाचं सेवन करण्यास सांगितलं जातं. त्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. या तीन गोष्टी एकत्र करुन यांचं सेवन करा.
2. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबू पाणी खूप उपयुक्त आहे. लिंबूपाण्यात पेक्टिन आणि पॉलिफेनॉल असतात, जे भूक कमी करण्याचं काम करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
3. चिकणा (Sida Cordifolia) ही आयुर्वेदातील एक अशी औषधी वनस्पती आहे, या औषधीला बाला असंही म्हणतात. ही औषधी वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये अल्कलॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
4. मध आणि दालचिनीचे सेवन केल्याने चरबीही कमी होण्यास मदत होते. यासाठी कोमट पाण्यासोबत मध आणि दालचिनी पावडर मिसळून सेवन करा.
5. मेथी वजन कमी करण्यात चमत्कारिक प्रभाव दाखवते. एक ग्लास पाण्यात मेथीचे दाणे भिजवा, हे पाणी रात्रभर तसंच ठेवा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मेथीमुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि गॅसच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
महत्वाच्या बातम्या :
- Monsoon Immunity : पावसाळ्यात 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा, आजारांपासून सुरक्षित राहा
- Heart Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा
- Retina Health : नजर कमकुवत होण्याला आजाराबरोबरच अनुवांशिकताही असू शकते जबाबदार! जाणून घ्या...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )