Health Tips : खबरदार! जेवण केल्यानंतर चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा तुमच्या आरोग्यवर होईल परिणाम
बहुतांश लोकांना जेवण केल्यानंतर काय टाळायला हवं याची काहीच कल्पना नसते. त्यामुळे डिनर किंवा जेवण केल्यानंतर काहीही चटफटर खातात आणि आजारांना निमंत्रण देतात.
Health Tips : बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर गोड पदार्थ खायला आवडतं. तर काही लोकांना जेवण केल्या केल्या झोपायला आवडतं. काही असेही महाशय आहेत की जेवण केल्यानंतर लगेच स्मोकिंग करतात आणि काहीजणांना तंबाखू खायची सवय असते. पण ही वाईट सवय आहे. त्यामुळे जेवण केल्यानंतर काहीही खात असाल, तर आधी विशेष काळजी घ्यायला हवी. अन्यथा तुमच्या आरोग्यावर (Health) दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डिनर किंवा जेवण केल्यानंतर कोणत्या गोष्टीं टाळायला हवं? (avoid after eating any food) याविषयी सविस्तर माहिती घेऊया...
जेवण केल्यानंतर चुकूनही 'या' गोष्टी करू नका
1. जेवण केल्या केल्या झोप घेणं टाळा
बहुतांश लोक जेवण केल्यानंतर मस्त झोप घेतात. पण ही चांगली सवय नाही. कारण आपण डिनर किंवा जेवण केल्यानंतर पचनसंस्थेच्या प्रक्रियावर परिणाम होऊ शकतो. पंचसंस्था मंदावल्यामुळे पोटातील अन्न पचवायला जास्त वेळ लागू शकतो.
2. सिगारेट पिण्यापासून दूर राहा
तुम्ही पाहिलं असेल की आपल्या आजूबाजूचे बरीच लोक जेवण केल्यानंतर सिगारेट पितात. पण ही सवय अत्यंत वाईट असून यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. याचं कारण जेवण केल्या केल्या स्मोकिंगचा फक्त आरोग्यावरच नव्हे, तर तुमच्या संपूर्ण मेटाबॉलिज्म सिस्टिमवर परिणाम होतो. याबाबत आरोग्य क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डिनर किंवा जेवण केल्यानंतर सिगारेट पिणं हे 10 सिगारेट पिल्यासारखं आहे.
3. अंघोळ करणं टाळा
कधीही जेवण केल्यानंतर चुकूनही अंघोळ करू नका. याचं कारण तुमचं मेटाबॉलिज्म सिस्टीम मंदावू शकते आणि पोटाच्या सर्व बाजूंच्या रक्त प्रवाहावर परिणाम होतो. तसेच, आपण अंघोळ करत असताना शरीरातील अन्य भागातही रक्तप्रवाह प्रभावित होतो आणि तुमच्या पंचनसंस्थेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.
4. जेवण केल्यानंतर लगेच फळे खाणं टाळा
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, फळे खाणं आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशिर आहे. परंतु, जेवण किंवा डिनर केल्यानंतर लगेच कोणत्याही फळांच सेवन करु नये. यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो आणि तुम्ही आजारी पडू शकता. तुम्हाला फळ खायचंच असेल, तर जेवण करण्याआधी आणि जेवण केल्यानंतर 2 तासाचा अंतर ठेवायलं हवं. ही सर्वात चांगली सवय आहे.
5. चहा पिणं टाळा
तुम्हाला जास्त प्रमाणात चहा प्यायची सवय असेल तर अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. कारण चहामध्ये कॅफिनचं प्रमाण असतं. यामुळे डिनर केल्यानंतर चहा पिणं टाळा. अन्यथा जेवण पचायला जड जाऊ शकतं. तसेच आपण खाल्लेलं अन्न पचायला जास्त वेळ लागू शकतं. जेवण केल्यानंतर चहा पिल्यामुळे शरीराला आवश्यक लोह शोषूण घेण्यास समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे डिनर केल्यानंतर चहा पिणं टाळलं, तर तुमचं आरोग्य चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )