Holi 2022 : होळीत रंग खेळताना केसांची घ्या 'अशी' काळजी
Holi 2022 : होळीत वापरल्या जाणाऱ्या केमिकल युक्त रंगांनी केस खराब होतात. त्यामुळे काही टिप्स फॉलो करायला हव्यात.
Holi 2022 : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. होळीत वापरल्या जाणाऱ्या केमिकल रंगांनी केस खराब होतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या रंगांमुळे अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो.
खोबरेल तेल : केसांसाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर असते. यामध्ये असलेले फॅटी अॅसिड्स, जीवनसत्त्वे केसांना चमकदार बनवण्यासोबत केसांची वाढ होण्यासदेखील फायदेशीर ठरतात.
होळी खेळायला जाण्याआधी खोबरेल तेल केसांना लावावे. त्यामुळे केस खराब होणार नाहीत.
लिंबू आणि ऑलिव्ह तेल :
केसांमधील अतिरिक्त तेल काढण्यासाठी लिंबाचा वापर करण्यात येतो. रंगांनी होळी खेळण्यापूर्वी लिंबू आणि ऑलिव्ह ऑइलचा हेअर मास्क बनवून केसांना लावावा. ऑलिव्ह ऑइलने बनवलेला केसांसाठी फायदेशीर ठरतो.
मोहरीचे तेल : रंगांची होळी खेळण्याआधी केसांना मोहरीचे तेल लावावे. त्यामुळे होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण होईल. मोहरीचे तेल खूप चिकट असते. त्यामुळे दोन ते तीन वेळा शॅम्पूचा वापर करुन केस धुवावेत.
होळीच्या दिवशी केसांचे रंगांपासून संरक्षण कसे कराल?
होळीचा रंग केसांमध्ये अशा प्रकारे शोषले जातात की ते सहजासहज निघत नाही. अशा परिस्थितीत केस सुरक्षित ठेवण्याचा उपाय म्हणजे डोक्यावर खोबरेल किंवा मोहरीचे तेल चांगले लावणे. जर तुम्ही तुमच्या केसांना चांगल्या प्रमाणात तेल लावले तर ते लेप म्हणून काम करते आणि केसांचे होळीच्या रंगात असलेल्या रसायने आणि इतर घटकांपासून संरक्षण करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Holi 2022 : होळी कोणत्या तारखेला आहे? जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि बरंच काही...
Holi 2022 : होळी रे होळी! होळीत केमिकलयुक्त रंग टाळा, घरच्या घरी फुलांपासून तयार रंग करा
Holi 2022 : रंगाच्या भीतीने होळी खेळणं टाळताय? चेहरा, केस आणि अंगावरील होळीचा रंग कसा काढायचा? वापरा 'या' टिप्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )