Health Tips : 8 तास झोप घेऊनही दिवसभरात झोप येते? असू शकतात हायपरसोमनियाची लक्षणं; वेळीच सावध व्हा
Hypersomnia Issue : हायपरसोमनिया असलेल्या लोकांना कधीही झोप येऊ शकते जसे की कामावर किंवा वाहन चालवताना आणि त्यांना जागे होण्यास खूप त्रास होतो.
Hypersomnia Issue : असं म्हटलं जातं की चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप (Sleep) घेणे आवश्यक आहे. म्हणूनच 8 तासांची (8 Hours) झोप मानवी शरीराला खूप महत्त्वाची आहे. पण असेही काही लोक आहेत जे 8 ते 9 तासांची झोप घेत असतानाही दिवसभरात झोप घेतात. खरंतर अशा लोकांना अशा आजाराने ग्रासले आहे ज्यामध्ये व्यक्तीला दिवसभर झोप येते. या आजाराचे नाव हायपरसोमनिया (Hypersomnia) असं आहे. हायपरसोमनिया असलेल्या लोकांना कामावर किंवा गाडी चालवताना कधीही झोप येऊ शकते आणि त्यांना उठतानाही खूप त्रास होतो. अशा लोकांना झोपेशी संबंधित इतर समस्या देखील असू शकतात, जसे की ऊर्जेची कमतरता, विचार करण्यात अडचण. नॅशनल स्लीप फाउंडेशननुसार (National Sleep Foundation), 40 टक्के लोकांमध्ये वेळोवेळी हायपरसोमनियाची काही लक्षणे दिसून येतात.
हायपरसोमनियाची लक्षणे
- हायपरसोमनियाचे प्राथमिक लक्षण म्हणजे जास्त झोप येणे.
- दिवसातून अनेक वेळा झोपणे
- 9 तासांपेक्षा जास्त झोप घेणे, तरीही आराम वाटत नाही.
- झोपेतून जागे होण्यात अडचण
- झोपेतून उठण्याचा प्रयत्न करताना गोंधळून जाणे.
- झोपेनंतर अस्वस्थ वाटणे.
- विचार करणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण
हायपरसोम्नियाची कारणे
- रात्री पुरेशी झोप न मिळणे
- ड्रग्ज किंवा अल्कोहोलचा अतिवापर
- जास्त वजन असणे
- ही समस्या आनुवंशिकतेमुळे देखील असू शकते.
- नैराश्यामुळे हायपरसोमनिया होऊ शकतो
- मानसिक विकार
- चिंता
हायपरसोमनिया टाळण्यासाठी काय करावे?
हायपरसोमनियाचे योग्य उपचार मनोचिकित्सकाने केले पाहिजेत. याशिवाय आपल्या आहाराचीही विशेष काळजी घ्यावी. इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी ध्यान आणि शारीरिक क्रियाकलाप देखील आवश्यक आहेत. कॅफिन आणि निकोटीनपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे. रात्री झोपताना आवाज आणि प्रकाशापासून अंतर राखणे आवश्यक आहे. त्याच्या उपचारांसाठी, डॉक्टर रक्त तपासणी, सिटी स्कॅन, पॉलिसोमनोग्राफी नावाची स्लिप चाचणी आणि इतर काही आवश्यक चाचण्या सुचवू शकतात.
तुम्हालासुद्धा 8 ते 9 तासांहून अधिक झोप येत असेल तसेच संबंधित जर लक्षणं आढळत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्त्वाच्या बातम्या :