![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : हिवाळ्यात 'या' गोष्टी खाण्यापूर्वी काळजी घ्या; पचण्यासाठी लागू शकतो दुप्पट वेळ
Health Tips : हिवाळ्यात काही पदार्थ पचविण्यासाठी शरीराला गरजेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. तसेच, याचा तुमच्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो.
![Health Tips : हिवाळ्यात 'या' गोष्टी खाण्यापूर्वी काळजी घ्या; पचण्यासाठी लागू शकतो दुप्पट वेळ Health Tips these food items take double time to digest in winter marathi news Health Tips : हिवाळ्यात 'या' गोष्टी खाण्यापूर्वी काळजी घ्या; पचण्यासाठी लागू शकतो दुप्पट वेळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/cf1279a15b7383f93176207fbb3c85071706667572360358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Food Not Good For Digestion : हिवाळ्यात (Winter Season) बिछान्यात बसून गरमागरम अन्न (Food) खाण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांत भूकही जास्त लागते आणि विविध पदार्थ खाण्याची इच्छाही होते. पण, हौसेच्या भरात खाल्ले जाणारे असे काही पदार्थ आहेत जे खरंतर पचायला दुप्पट वेळ घेतात. याची तुम्हाला माहिती आहे का? कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे सत्य आहे की, हिवाळ्यात काही पदार्थ पचविण्यासाठी शरीराला गरजेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. तसेच, याचा तुमच्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो. हे पदार्थ नेमके कोणते याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food)
प्रक्रिया केलेले अन्न आजकाल लोकांच्या आहाराचा एक भाग झाले आहेत. ज्यामध्ये ट्रान्स फॅट, रिफाइंड कार्ब आणि सोडियम जास्त प्रमाणात असते. हिवाळ्यात अशा अन्नपदार्थांचे पचन करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि हिवाळ्यात हे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी, बद्धकोष्ठता, गॅस, छातीत जळजळ आणि अपचन होऊ शकते.
दुग्धजन्य उत्पादने (Milk Products)
यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हिवाळ्या दुग्धजन्य पदार्थ पचायला वेळ लागतो. या पदार्थांत दूध, चीज, दही यांचा समावेश होतो. विशेषत: लैक्टोज असहिष्णुतेने ग्रस्त असलेल्यांनी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अतिशय विचारपूर्वक करावे, कारण त्यामुळे गॅस होऊ शकतो. याशिवाय अतिसार, उलट्या आणि पोटदुखी यांसारख्या समस्याही उद्भवू शकते.
मसालेदार अन्न
हिवाळ्यात काही लोक असेही आहेत ज्यांना गरमागरम आणि मसालेदार पदार्थ खायला खूप आवडतात. पण, साधारण ज्या पदार्थांमध्ये लाल मिरची आणि गरम मसाले वापरले जातात. ते, पदार्थ खरंतर पचायला फार कठीण असतात. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. यामध्ये तुम्हाला अपचन, अतिसार, पोटदुखी, पोटात जळजळ होणे तसेच गॅस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
गोड पदार्थ
थंडीचे दिवस म्हटल्यानंतर बाजारात गाजर दिसू लागतात. हिवाळ्यात गाजराचा हलवा आणि गुलाबजामुन अगदी आवडीने खाल्ले जातात. यामुळे खरंतर मन प्रसन्न होतं. पण हे गोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? विशेषत: हिवाळ्यात मिठाई खाल्ल्यास शरीरात फ्रक्टोजचे विघटन होण्यास बराच वेळ लागतो आणि त्यामुळे शरीरात अनहेल्दी बॅक्टेरिया देखील वाढू लागतात, ज्यामुळे कधी कधी आतड्यांसंबंधी सूज, पोटदुखी आणि गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : सावधान! स्ट्रीट फूडमध्ये वारंवार वापरलं जाणारं तेल आरोग्यासाठी घातक; 'या' आजारांचा वाढता धोका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)