
Winter Health Tips : हिवाळ्यात रोज 5 प्रकारचे लाडू खा; हाडे मजबूत होतील, आजारही होतील दूर
Winter Health Tips : डिंकाच्या लाडूमध्ये कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात आढळतात.

Winter Health Tips : हिवाळ्यात (Winter Season) वाढत्या थंडीबरोबरच आपल्या आरोग्याची (Health) खूप काळजी घ्यावी लागते. तसेच, आरोग्याबरोबरच आपल्या आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. या ऋतूत शरीराला उबदार ठेवण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे लाडू बनवून खातात. या लाडूमुळे शरीर उबदार तर राहतेच पण त्याचबरोबर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. जरी सगळे लाडू चविष्ट असले तरी काही लाडू असे आहेत जे हाडांच्या (Bones) आरोग्यासाठी चांगले असतात. हिवाळ्यात हाडांच्या आरोग्यासाठी खाल्ले जाणारे 5 लाडू कोणते ते या ठिकाणी आपण जाणून घेऊयात.
ड्रायफ्रुट्सचे लाडू
सुक्या मेव्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात काजू, बदाम आणि खजूर यांसारख्या सुक्या मेव्यापासून बनवलेले लाडू खाल्ल्याने कमकुवत झालेली हाडे मजबूत होतात. यामुळे मानसिक समस्याही दूर होतात. ड्रायफ्रूट्सचे लाडू मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतात. यामुळे शरीराला भरपूर उष्णता मिळते.
डिंकाचे लाडू
डिंकाच्या लाडूमध्ये कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात आढळतात. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. डिंकाचे लाडू हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहेत. डिंकाचे लाडू खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
शेंगदाण्याचे लाडू
शेंगदाण्यात कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. शेंगदाण्याचे लाडू चवीलाही छान, चविष्ट लागतात. तसेच, हे लाडू आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. हे पचनासाठी खूप चांगले मानले जातात. हे लाडू शरीराला उबदार ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
तिळाचे लाडू
तिळाचे लाडू शरीराला उबदार ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. हे लाडू खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते.
अळशीचे लाडू
अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि प्रथिने आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि वजन झपाट्याने कमी होते. अशा परिस्थितीत या लाडूंचे सेवन फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थिती हिवाळ्याचे लाडू घरच्या घरी केल्याने हाडांना तसेच शरीराला खूप आरोग्यदायी फायदे मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
