(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Winter Health Tips : हिवाळ्यात आजारांपासूनही दूर राहाल आणि रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल; फक्त 'या' भाज्यांचा आहारात समावेश करा
Winter Health Tips : व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना मानली जाणारी ब्रोकोली डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Winter Health Tips : हिवाळ्यात कमी तापमान, थंड वारा आणि कमी सूर्यप्रकाशामुळे अनेक रोगांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणं खूप आव्हानात्मक होते. तुम्ही निरोगी आहार घेऊन आपली प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता. जेणेकरून आपले शरीर रोगांपासून स्वतःचे संरक्षण करू शकेल. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही भाज्या घेऊन आलो आहोत, ज्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी या भाज्या खूप उपयुक्त आहेत.
ब्रोकोली
व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना मानली जाणारी ब्रोकोली डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने डोळ्यांच्या समस्या आणि वाढत्या वयात होणाऱ्या मोतीबिंदूपासून आराम मिळतो. त्यात आढळणारे व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कोलेजन उत्पादन, जखम भरणे आणि लोह शोषण्यास मदत करते. याशिवाय व्हिटॅमिन ए, सी आणि ई सोबत फायबर देखील आढळते.
पालक
व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम समृद्ध पालक, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. त्यामुळे रोग निर्माण करणारे विषाणू आणि बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. हे शरीराला इतर धोक्यांपासून वाचवते आणि कोणतीही नुकसान होऊ देत नाही. पालक ही खूप फायदेशीर भाजी आहे. त्यामुळे व्हिटॅमिन ए आणि सी बरोबरच अनेक अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात. त्यात लोह देखील मुबलक प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम आहे.
लसूण
लसणाचा वापर जंतुनाशक, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल एजंट म्हणून केला जातो. हे शरीराला विषाणू आणि इतर सूक्ष्मजीवांपासून वाचवण्याचे काम करते. लसणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते आणि शरीराला आजारांपासून संरक्षण मिळते. अॅलिसिन लसणात आढळते, जे प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखले जाते.
कंदमुळाची भाजी
कंदमुळाची भाजी तुम्ही कच्ची किंवा शिजवून खाऊ शकता. त्यात व्हिटॅमिन ए, बी1, बी2, बी3, बी5 आणि व्हिटॅमिन सी तसेच फोलेट, फायबर, लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर रोगांशी लढण्यास सक्षम बनते. कंदमुळाच्या भाजीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के देखील आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. ही भाजी आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : हिवाळ्यात ज्यूस पिणं आरोग्यदायी आहे का? आयुर्वेदात काय म्हटलंय? वाचा सविस्तर