एक्स्प्लोर

Kalyan Crime: तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल

Kalyan Crime: कल्याणजवळील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना उपशहर प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan Crime: कल्याणजवळील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या (शिंदे गट) युवा सेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवकाचा मुलगा वैभव पाटील (Vaibhav) याच्यासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बांधकाम सुरू असलेल्या 'मंगेशी कन्स्ट्रक्शन'च्या साइटवर येऊन आरोपींनी काम बंद पाडले, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा विकासकाचा आरोप आहे तर निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांनी रचलेला हा डाव असून, व्यावसायिकाला हाताशी धरून चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप वैभव पाटील यांनी केला आहे. सध्या याप्रकरणी खडकपाडा पोलिसानी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.  (Kalyan Crime)

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण पश्चिममधील बांधकाम व्यावसायिक मंगेश दशरथ गायकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गायकर यांची वडवली परिसरात 'मंगेश स्टार', 'मंगेशी हेवन' आणि 'मंगेशी जेमिनी' या नावाचे बांधकाम प्रकल्प (प्रोजेक्ट) सुरू आहेत.​ 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.33 वाजता वैभव दुर्योधन पाटील आणि सुनिल राजाराम पाटील यांच्यासह एकूण 7 आरोपींनी (पंकज पाटील, उद्धव पाटील, तेजस पाटील, ध्रुव पाटील, करण पाटील) बेकायदेशीररित्या साइटवर येऊन कामगार आणि कंत्राटदारांना व ऑफिस स्टाफला शिवीगाळ करत काम पूर्णपणे बंद पाडले. 

Kalyan Crime: नाहीतर जीवे ठार मारीन

हा एरिया आमचा आहे. माल आमच्याकडून घ्यावा लागेल. माल नाही घेतल्यास प्रत्येक गाडीमागे 3,000 रुपये द्यावे लागतील, अशी अवैध पैशांची मागणी करत आम्ही सांगत नाही तोपर्यंत साईट चालू करायची नाही, नाहीतर जीवे ठार मारीन, अशी थेट धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी दोन वेळा अशाच प्रकारे धमक्या देऊन डिमांड करत होते ही त्यांची तिसरी वेळ होती, त्यामुळे यापुढे दादागिरी सहन न करण्याचा निर्णय घेत पोलिसांत धाव घेतल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. कामासाठी तांत्रिक कौशल्ये (टेक्निकल स्किल) असलेल्या कामगारांची गरज असते, त्यामुळे सर्व स्थानिक लोकांना काम देणे शक्य नसते, असे त्यांनी स्पष्ट करत आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

Kalyan Crime: वैभव पाटलांनी सर्व आरोप फेटाळले

तर मंगेश गायकर यांच्या आरोप आणि तक्रारीनंतर ​युवा सेना उपशहर प्रमुख आणि आरोपी वैभव पाटील यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळत मी स्थानिक व्यावसायिक, गावातील स्थानिक तरुणांना काम मिळावे, यासाठी बांधकाम व्यावसायिकांशी दोन वेळा बैठका घेतल्या होत्या, पण काम दिले नाही. आता ​गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 20 दिवसांनंतर गुन्हा दाखल करणे, हे संशयास्पद आहे. ​"मी हप्ते मागत असेल, तर त्यांनी  पुरावा द्यावा. मी तसे काहीही मागितलेले नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांनी रचलेला हा डाव असून, व्यावसायिकाला हाताशी धरून चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रति-आरोप वैभव पाटील यांनी केला आहे. सध्या याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.

आणखी वाचा 

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget