एक्स्प्लोर

Bihar Election Result 2025: पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर!

Bihar Election Result 2025: महिलांना त्यांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय.

Bihar Election Result 2025: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Election Result 2025) एनडीएने (NDA) मोठा विजय मिळवत तब्बल 202 जागा जिंकल्या आहेत. विरोधकांच्या महागठबंधनला अवघ्या 35 जागांवर विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का बसलाय. बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना बिहारमधील महिलांना त्यांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही (Election Commission) गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे, अशी टीका केली. आता शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis on Sharad Pawar: जो जीता वही सिकंदर: देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो जीता वही सिकंदर. हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारायला हवा. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण करायला हवं. पण आत्मपरीक्षण करणं हे विरोधी पक्षांना मान्य नाही. तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही योजना का आणल्या नाहीत? आम्ही ज्या योजना आणल्या त्या लोकांना आवडल्या. त्यावर लोकांनी मतदान केलं तर लोकांना दोष देण्याचं कारण काय? असे प्रतिक्रिया त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर दिली आहे.  

Sharad Pawar on Devendra Fadnavis: नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

बिहार निवडणुकीच्या निकालावर शरद पवार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीचे मतदान झाले. त्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत मतदान महिलांनी हातामध्ये घेतले होते. एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला, याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा. महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले, प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्या वतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले म्हणजेच लाडकी बहीण योजना. यापुढील निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने देखील याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले होते.  

आणखी वाचा 

34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Embed widget