Room Heater Side Effects : हिवाळ्यात रूम हीटर जपून वापरा; तुमची एक चूक पडू शकते महागात
Room Heater Side Effects : हिवाळ्यात रूम हीटर जपून वापरावा. रूम हीटर फक्त कमी कालावधीसाठी चालवावा.
![Room Heater Side Effects : हिवाळ्यात रूम हीटर जपून वापरा; तुमची एक चूक पडू शकते महागात health tips room heater side effects know how to use room heater marathi news Room Heater Side Effects : हिवाळ्यात रूम हीटर जपून वापरा; तुमची एक चूक पडू शकते महागात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/ab1e9e6e6891c377f469c7fe647e063a1701764420011358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Room Heater Side Effects : हिवाळा (Winter Season) सुरु झाला आहे. त्यानुसार हवेतही गारवा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या घरांसाठी रूम हिटर (Room Heater) वापरायला सुरुवात केली आहे. थंडीच्या वातावरणात रूम हीटरचा वपर मोठ्य प्रमाणात केला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का या रूम हिटरचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे तोटेही आहेत. म्हणजेच रूम हिटर चुकूनही रात्रभर चालू ठेवू नये. नाहीतर तो जीवघेणा ठरू शकतो. तसेच, गेल्या काही वर्षांत रूम हिटरमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
हिवाळ्यात रूम हीटर जपून वापरा
तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात रूम हीटर जपून वापरावे. रूम हीटर फक्त कमी कालावधीसाठी चालवावे. रात्री हीटर लावून झोपण्याची चूक कधीही करू नये. अन्यथा ते जीवघेणेही ठरू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्या खोलीतील वायुवीजन योग्य नसेल तर रात्रभर हीटर चालवल्याने खोलीत कार्बन मोनोऑक्साइड वायू भरतो आणि ऑक्सिजन कमी होऊ शकतो. अशा स्थितीत झोपेत असतानाही श्वासोच्छवास बंद होऊ शकतो. त्यामुळे अशा चुका करणे टाळावे. रूम हीटरचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर केला जाऊ शकतो. दमा आणि श्वसनाच्या रुग्णांनी शक्य तितक्या कमी प्रमाणात हीटर चालवावा.
रुम हीटर वापरण्याचे 5 तोटे
1. तज्ज्ञांच्या मते, रूम हीटर खोलीतील हवा कोरडे करण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. आधीच कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी रूम हीटर पूर्णपणे टाळावे.
2. रुम हीटर जास्त चालवल्याने डोळ्यांवरही परिणाम होतो. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि जळजळीची भावना होऊ शकते. असे झाल्यास, हीटर ताबडतोब बंद करा.
3. काही लोकांना रूम हीटरची ऍलर्जी देखील असते. त्यातून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे नाकही कोरडे होऊ शकते.
4. दमा किंवा श्वसनाच्या रुग्णांनी रूम हीटरमध्ये जास्त वेळ राहू नये. अन्यथा खोलीतील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
5. रूम हीटरमधून निघणारा कार्बन मोनोऑक्साइड वायू आरोग्यासाठी धोकादायक असतो. यामुळेच रूम हीटरचा दीर्घकाळ वापर टाळावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)