(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Motion Sickness : प्रवासात उलटीचा त्रास तुम्हालाही होतो ना? 'या' सोप्या टिप्स तुमच्यासाठी रामबाण उपाय
Motion Sickness : जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल पण प्रवास करताना उलट्या होण्याची भीती वाटत असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे.
Motion Sickness : बस किंवा कारमधून प्रवास (Travelling) करताना अनेकदा लोकांना मळमळल्यासारखे वाटते हे अनेकदा आपण पाहिलं आहे. बऱ्याचदा हा प्रकार मोशन सिकनेसमुळे (Motion Sickness) होतो. त्यावर उपचार करण्याच्या पद्धतींकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, तर तुमचा तसेच तुमच्या प्रवासातील मित्र-मैत्रीण, जोडीदाराचा प्रवास खराब होऊ शकतो. कारण असे काही लोक असतात ज्यांना फक्त दुसऱ्याला उलटी करताना पाहून मळमळ होते.
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल पण प्रवास करताना उलट्या होण्याची भीती वाटत असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला अस्वस्थता, उलट्या आणि मळमळ यांसारख्या समस्यांपासून वाचवतील आणि तुमचा प्रवासही मजेशीर बनवतील.
- प्रवासात डाळिंबाचे दाणे, हिंग डायजेस्टर किंवा गॅस पावडर बरोबर ठेवायला विसरू नका. उंच डोंगरावर मळमळ झाल्यास या गोष्टी चव बदलून आराम देतात.
- तुम्ही तुमच्याबरोबर लिंबूपाणी किंवा एखादा सोडा देखील घेऊन जाऊ शकता. यामुळे तुमचा मूड फ्रेश होण्यास मदत होईल आणि पोटातली मळमळ थांबेल.
- प्रवास करताना काळे मीठ बरोबर ठेवा. तुम्हाला जर प्रवासा दरम्यान अस्वस्थ वाटत असेल तर पाण्यात लिंबू आणि मीठ मिसळून प्यायल्याने उलट्या आणि मोशन सिकनेसपासून आराम मिळतो.
- प्रवासादरम्यान तुम्हाला उलट्यांचा त्रास होत असेल, तर जास्त वेळ खिडकीबाहेर पाहणे टाळा. यामुळे, मेंदूला काही सिग्नल मिळू लागतात जे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करून तुम्हाला उलट्या होऊ शकतात.
- प्रवास करताना फक्त हलकं अन्नच बरोबर घ्या. जास्त अन्न खाल्ल्याने तुम्हाला उलट्यांचा त्रासही होऊ शकतो. अगदीच तुम्हाला भूक लागली तर तुम्ही फळांचे देखील सेवन करू शकता.
- जर तुम्ही कार किंवा बसने प्रवास करत असाल, तर मागच्या सीटवर बसू नका. कारण मागच्या सटवर बसल्याने गाडीची आदळआपट होऊन तुम्हाला धक्का बसू शकतो.
- जर अंतर लांब असेल तर अधून मधून प्रवास करण्याचा प्रयत्न करा. तसेच मोबाईल किंवा लॅपटॉपचा जास्त वापर करू नका.
- न खाता प्रवास करणे देखील चुकीचे आहे, यामुळे मोशन सिकनेस देखील होतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.