(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : निरोगी राहण्यासाठी मॅग्नेशियम का महत्त्वाचं? मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरावर होतात 'हे' परिणाम
Health Tips : मॅग्नेशियम, हे एक आवश्यक खनिज आहे जे मानवी शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते.
Health Tips : आपण सर्वजण लहानपणापासून पाहत आलो आहोत की शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी सर्व पोषक तत्व आवश्यक असतात. शरीरातील सर्व पोषक तत्वांचा पुरवठा झाल्यामुळे आपण अनेक रोग आणि समस्यांपासून सुरक्षित राहतो. मॅग्नेशियम हे या पोषक घटकांपैकी एक आहे. पण, मॅग्नेशियम (Magnesium) शरीरासाठी का गरजेचं आहे? मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरावर कोणते परिणाम होतात? आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणं कोणती आहेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मॅग्नेशियम काय आहे?
मॅग्नेशियम, हे एक आवश्यक खनिज आहे जे मानवी शरीरात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्नायूंच्या कार्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. मॅग्नेशियम प्रथिने संश्लेषण, ऊर्जा उत्पादन आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासह विविध रासायनिक अभिक्रिया पुरवतात.
मॅग्नेशियम तुमच्यासाठी महत्त्वाचे का आहे?
मॅग्नेशियम आपल्या शरीराच्या अनेक आवश्यक कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे सामान्य मज्जातंतू आणि स्नायूंचे कार्य राखण्यास मदत करते, निरोगी रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देते, हृदयाचे ठोके आणि निरोगी हाडे नियंत्रित करते. शरीर मजबूत राहण्यास मदत करते. मॅग्नेशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते आणि ऊर्जा चयापचय आणि प्रथिने संश्लेषणामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
मॅग्नेशियमच्या कमतरतेचे परिणाम?
शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी मॅग्नेशियम महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत त्याची कमतरता अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. मॅग्नेशियमची कमतरता मधुमेह, उच्च रक्तदाब, मायग्रेन आणि नैराश्यासह अनेक रोगांशी निगडीत आहे. अशा परिस्थितीत, त्याची कमतरता दूर करण्यासाठी, आपण आपल्या आहारात भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स, पालक, बदाम आणि एवोकॅडो यांसारखे मॅग्नेशियमयुक्त पदार्थ समाविष्ट करू शकता.
मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखावी?
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता ओळखून ती भरून काढणं महत्त्वाचं आहे. शरीरातील या महत्त्वाच्या पोषक तत्वाची कमतरता विविध मार्गांनी ओळखली जाऊ शकते. यामध्ये भूक न लागणे, मळमळ होणे, उलट्या, थकवा, असामान्य हृदयाचे ठोके यांसारखी गंभीर लक्षणे यांचा समावेश होतो. त्यामुळे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भासू देऊ नका.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या