(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : दिवसभर झोप येत असेल तर, 'या' गोष्टी तुमच्या आहारातून काढून टाका; दिवसभर फ्रेश राहाल
Food For Energy : जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल आणि झोप येत असेल तर यासाठी तुमचा आहाराची वेळ कारणीभूत असू शकते.
Food For Energy : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे दिवसभर सतत थकलेले दिसतात. असे लोक अनेकदा थकवा आणि अपुऱ्या झोपेचं कारण देतात. पण, यामागे त्यांची बिघडलेली जीवनशैली (Lifestyle) हे देखील मुख्य कारण आहे. जर तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्हाला अनेकदा थकवा जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही विशेष बदल करणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आहारात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या शरीराला आणि मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवतात. थकवा आणि झोप टाळण्यासाठी या गोष्टी आहारातून काढून टाकल्या पाहिजेत. हे पदार्थ नेमके कोणते या संदर्भात जाणून घेऊयात.
थकवा दूर करण्यासाठी 'या' गोष्टी खाऊ नका
- साखर आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. साखरेचं सेवन केल्याने शरीराला झटपट ऊर्जा तर मिळतेच पण त्याचबरोबरही ऊर्जा लवकर कमी देखील होते. अशा परिस्थितीत जास्त साखरेचे पदार्थ खाऊ नयेत.
- ब्रेड, पांढरा भात, पांढरा ब्रेड, पास्ता इत्यादींमध्ये फायबरचं प्रमाण खूपच कमी असते. हे शरीरात नीट पचतही नाहीत. त्यामुळे थकवा जाणवतो.
- जास्त फॅटयुक्त पदार्थांचेही शरीरावर दीर्घकाळ वाईट परिणाम होतात. शरीरासाठी काही फॅट आवश्यक असले तरी, त्याच्या अतिरेकामुळे तुम्हाला लवकर झोप आणि थकवा येऊ शकतो.
- आजकाल फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड खूप लोकप्रिय आहे. लोक ते आवडीने खातात पण दीर्घकाळापर्यंत ते शरीराला हानी पोहोचवतात. या प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आणि साखरेसह अनहेल्दी फॅट असतात. या सर्व गोष्टी खाल्ल्याने शुगर लेव्हल वाढते आणि शरीरात एनर्जी कमी होते. अशा स्थितीत शरीर थकवा आणि झोपेची कमतरता यांचे शिकार बनते.
- तसेच, तुम्ही जे एनर्जी ड्रिंक्स घेता त्यातून तुम्हाला झटपट ऊर्जा जरी मिळत असली तरी ही ऊर्जा तितक्याच लवकर कमी देखील होते. आणि तुम्हाला थकवा जाणवतो.
- लोहाची कमतरता असलेले अन्नही शरीराला हानी पोहोचवते. शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी लोह आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी वेळीच या पदार्थांचं सेवन करणं थांबवा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या