(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : 'या' फळांमुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल; आजपासूनच त्यांचा आहारात समावेश करा
Health Tips : मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अँटीऑक्सिडंटयुक्त पोषक घटकांचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे पोट निरोगी राहते.
Health Tips : बदलत्या हवामानात, कमकुवत प्रतिकारशक्ती (Immunity) असलेल्या लोकांना सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता असते. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, लहान मुले देखील संक्रमणास बळी पडतात आणि त्यांना वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो.
लहानपणी सर्व मुले (Children) नाजूक असतात आणि त्यांच्या खाण्या-पिण्यातील कुरबुरी देखील त्यांना लवकर बरे होऊ देत नाहीत. मग पालकांची काळजी आणखी वाढते. पण पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण आज आपण अशाच काही फळांबद्दल बोलणार आहोत, जे मुलांना तर आवडतीलच पण त्यांची प्रतिकारशक्तीही वाढेल.
मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अँटीऑक्सिडंटयुक्त पोषक घटकांचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे पोट निरोगी राहते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. त्यासाठी स्ट्रॉबेरी, रताळे, संत्री, किवी, ब्लॅकबेरी, द्राक्षे, पेरू यांसारखी व्हिटॅमिन सी समृद्ध फळे खायला देणं गरजेचं आहे. आंबट फळे ही रोगप्रतिकारक शक्तीचा चांगला स्रोत मानली जातात.
मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणारी फळे
लिंबू पाणी
मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना रोज सकाळी लिंबू पाणी प्यायला द्या. यासाठी एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळा, त्यात एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठही टाका. मुलांना हे पाणी खूप आवडेल आणि ते त्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल.
जांभूळ
व्हिटॅमिन सी समृद्ध जांभूळ मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल, म्हणून ते मुलांना नक्कीच खायला द्या. जर तुमच्या मुलाला जांभूळ खायला आवडत नसेल तर त्याच्या बिया वेगळ्या करून त्यात काळे मीठ आणि भाजलेले जिरे टाका आणि जांभळाचा शेक बनवा. हा शेक मुलांना नक्कीच आवडेल. इतकेच नाही तर यामध्ये असलेले फायबर त्यांच्या पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासही मदत करेल.
संत्री
संत्र्याचा रस मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करतो, त्यामुळे तुम्हीही तो तुमच्या मुलांना देऊ शकता. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मुलांना कोणत्याही संसर्गापासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहे.
द्राक्ष
व्हिटॅमिन सी समृद्ध द्राक्षे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, म्हणून मुलांच्या आहारात द्राक्ष या फळाचा समावेश करा.
पेरू
पेरू हे जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेले उच्च ऊर्जा असलेले फळ आहे. तुम्ही पेरू कापून किंवा त्याचा ज्यूस बनवून मुलांना देऊ शकता. यामुळे मुलांच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :