Health Tips : औषध न घेताही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येईल, मधुमेही रुग्णांसाठी पेरूची पानं वरदान; 'असं' सेवन करा
Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांना योग्य आहार पाळण्याचा सल्ला दिला जातो. आहार योग्य असेल तरच औषधांचाही प्रभाव होतो.
![Health Tips : औषध न घेताही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येईल, मधुमेही रुग्णांसाठी पेरूची पानं वरदान; 'असं' सेवन करा Health Tips guava leaf benefits to control high blood sugar in diabetes marathi news Health Tips : औषध न घेताही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येईल, मधुमेही रुग्णांसाठी पेरूची पानं वरदान; 'असं' सेवन करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/13/ee888bfd08194f15b59dd1bc32dcc10d1697187905310358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips : मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. औषधे आणि योग्य आहारानेच (Food) मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आहार योग्य असेल तरच औषधेही तुमच्यावर योग्य प्रकारे प्रभाव करू शकतात. याशिवाय काही नैसर्गिक पद्धतींनीही उच्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. काही नैसर्गिक उपाय इतके प्रभावी आहेत की नियमित वापरल्यास रक्तातील साखरेची पातळी कायम राहते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पानाबद्दल सांगणार आहोत, जे रोज चघळल्याने मधुमेहापासून आराम मिळू शकतो.
पेरूचे पान (Guava Leaf) हे मधुमेहावर रामबाण उपाय आहे
मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून निरोगी राहू शकतात. पेरूच्या पानांचे फायदे तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. या पानांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी लवकर नियंत्रणात येते. रात्री झोपण्यापूर्वी पेरूची पाने चघळल्याने रक्तातील साखरेची पातळी कायम राहते. हे पान केव्हाही चघळता येत असलं तरी रात्रीच्या वेळी या पानाचा जास्त फायदा होतो. कारण रात्री जेवल्यानंतर ते रात्रभर पोटात कार्य करते आणि सकाळी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. ज्यांना रिकाम्या पोटी रक्तातील साखर वाढण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकते.
पेरूच्या पानांचे सेवन कसे करावे?
पेरूची पाने चघळताना लक्षात ठेवा की, ते पूर्णपणे पिकलेले किंवा आकाराने मोठे नसावेत. कच्ची आणि लहान पाने चांगली मानली जातात. पेरूची तीन-चार पाने घ्या, स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा आणि प्रत्येकी एक पान चावा. त्यातून बाहेर पडणारा रस नीट चोखून घ्या आणि नंतर उरलेला भाग थुंकून टाका.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच सेवन करा
लक्षात ठेवा की मधुमेहासारख्या दिर्घकालीन आजाराचा सामना करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घेत राहणं गरजेचं आहे. याशिवाय खाण्याकडेही विशेष लक्ष द्या. जर तुम्हाला पेरूच्या पानांचे सेवन करायचे असेल तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)