एक्स्प्लोर

Health Tips : उन्हाळ्यात पुदिना आहे आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या याचे अनेक फायदे

Health Tips : उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी पुदिना का सर्वात जास्त फायदेशीर आहे. जाणून घ्या पुदिन्याचे कोणते फायदे आहेत.

Health Tips : उन्हाळ्यात उष्माघात, त्वचा कोरडी होणे, अन्न न पचणे यांसारख्या समस्या अनेकदा लोकांना होतात. जसजशी उष्णता वाढते तसतसे शरीराचे तापमानही वाढते. त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात अपचनाची समस्याही सुरू होते. त्यामुळे लोक जेवण टाळतात. एवढेच नाही तर, उन्हात बाहेर पडल्यावर उष्माघात होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे आजारी पडण्याची भीती निर्माण होते. 

अशा परिस्थितीत या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी लोक विविध उपाय करतात. पण, त्याचा काही विशेष परिणाम होताना दिसत नाही. यावर रामबाण उपाय म्हणजे पुदिन्याची पाने. पुदिन्याच्या पानांमध्ये इतके पोषक तत्व असतात जे या सर्व समस्या दूर करतात. .

खरंतर, पुदिना आपल्या पोटासाठी, त्वचेसाठी आणि तोंडासाठी फायदेशीर आहे. प्रत्येकाने पुदिन्याचे सेवन अवश्य करावे. तुमच्या त्वचेसाठी पुदिना कसा फायदेशीर आहे ते जाणून घ्या. 

1. तोंडाची दुर्गंधी दूर करते - अनेकदा ऑफिसच्या वेळेत कांदा खाण्याची भीती वाटते. कारण कांदा खाल्ल्याने लगेच तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत पुदिन्याची पाने ही दुर्गंधी दूर करू शकतात. पुदिन्याच्या पानांचा सुगंध खूप सुवासी असतो. ही पाने खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.     

2. चेहऱ्याला थंडावा देते - उन्हाळ्याच्या त्वचा खूप कोरडी होते बऱ्याचदा कोरडीही पडते. अशा परिस्थितीत चेहरा जिवंत राहावा आणि त्वचा तजेलदार राहावी यासाठी चेहरा थंड ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी पुदिन्याची पाने बारीक करून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचाही चांगली राहते आणि चेहऱ्यालाही थंडावा मिळतो. 

3. उष्णतेपासून संरक्षण - उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशामुळे अनेकदा लोकांना उष्माघात होतो. परिणामी आजारी पडण्याची लक्षणं जास्त दिसतात. अशा परिस्थितीत उष्माघातापासून बचाव करण्यासाठी पुदिन्याची पाने खूप प्रभावी ठरतात. कारण पुदिन्याच्या पानांमध्ये असे अनेक घटक असतात, जे शरीराला उष्माघातापासून वाचविण्यास मदत करतात. पुदिन्याचा रस पिऊन थोडासा दिलासा मिळतो. तसेच पोटाला थंडावाही मिळतो. 

4. अन्न पचण्यास मदत - उन्हाळ्यात अन्न लवकर पचत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी पुदिन्याचे सेवन करा. कारण पुदिन्याची पाने पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतात. पुदिन्याची काही पाने बारीक करून त्यात कांद्याचा रस आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला. यामुळे अन्न पचनास मदत होईल. 

5. उलटीपासून बचाव - उन्हाळ्यात अनेकदा गॅस किंवा बाहेरचे अन्न खाल्ल्याने उलट्यांचा त्रास सुरू होतो. उलट्या थांबविण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा रस प्या. उलट्या लगेच थांबतील. अशा प्रकारे, उलट्या रोखण्यासाठी देखील पुदिना फायदेशीर ठरतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget