(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dragon Fruit Health Benefits : ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी गुणकारी; सेवन केल्यास 'या' आजारांपासून राहाल दूर
Dragon Fruit Health Benefits : ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
Dragon Fruit Health Benefits : ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) शरीरासाठी फार गुणकारी आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस ड्रॅगन फ्रूटची बाजारात मागणी फार वाढतेय. कारण या फळांत अनेक प्रकारचे पोषक गुणधर्म असतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण करता येते. त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. ड्रॅगन फ्रूटचा शरीरासाठी कसा फायदा होतो हे जाणून घ्या.
ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Health Benefits) हे इतर फळांपेक्षा वेगळे ठरते. कारण यामध्ये अनेक फायदे दडलेले आहेत. तसेच, कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकजण ड्रॅगन फ्रूटचा वापर करत होते. वाचा याचे अन्य फायदे.
ड्रॅगन फ्रूट्सचे फायदे (Dragon Fruit Health Benefits) :
त्वचा निरोगी ठेवण्यास ड्रॅगन फ्रूट उपयोगी : ड्रॅगन फ्रूट्स त्वचेशी संबंधित विकार दूर करण्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत. या फळापासून तुम्ही नैसर्गिक फेस पॅक तयार करू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो. ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले फॅटी अॅसिड एक्जिमा, सोरायसिस सारख्या समस्या दूर करू शकतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन बी३ आढळते ज्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते.
निरोगी केस राखण्यासाठी : ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Health Benefits) हे त्वचेसाठी फायदेशीर तर आहेच. पण तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा ड्रॅगन फ्रूटचा वापर होतो. या फळामध्ये असलेले फॅटी अॅसिड केसांमधील कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करतात.
साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत : ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Health Benefits) रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स जसे की, झफ्लाव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक अॅसिड, फेनोलिक अॅसिड आणि फायबर असतात जे साखरेची पातळी नियंत्रित करतात. याच्या सेवनाने तुम्ही मधुमेहावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता.
कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त : शरीरातील वाढलेले कॉलेस्ट्रॉल हे अनेक आजारांचे कारण ठरू शकते. विशेषत: यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक असतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर ड्रॅगन फळ खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :