Health News : 55 वय नुसतं नावाला, महिलेने 6 पॅक ऍब्स बनवून दाखवून दिलं! फक्त 3 व्यायामांचं गुपित सांगितलं
Health News : 55 वर्षीय महिला ट्रेनरने 6 पॅक ऍब्स बनवले, पोटाची चरबी कमी करण्यासाठी 3 व्यायाम सांगितले, तुम्हीही एकदा पाहाच...
Health News : असं म्हणतात ना, उम्र 55 की और दिल बचपन का..! एका 55 वर्षाच्या महिलेने जगाला असं काही करून दाखवलंय, ज्यामुळे लोक तिचे अक्षरश: फॅन झाले आहेत. तुम्हाला माहित आहे का? एका 55 वर्षांच्या महिला फिटनेस ट्रेनरकडे चक्क 6 पॅक ऍब्स आहेत आणि ते ऍब्स 25 वर्षांच्या मुलीसारखे आहेत. महिला प्रशिक्षकाने पोटाची चरबी कशी कमी करावी याबद्दलही सांगितले आहे.
तरुणांना लाजवतील असे 55 वर्षांच्या महिलेचे ऍब्स!
55 वर्षांच्या महिलेचे ऍब्स बघाल तर ते तरुणांना लाजवतील असे आहेत. पोटाचे स्नायू, म्हणजे abs, प्रत्येक व्यक्तीला ऍब्स असतात, जरी तो एक चरबीयुक्त पोटाचा माणूस असला तरीही. प्रत्येकाला ऍब्सचे स्नायू असतातच, फक्त ज्यांच्या शरीरात चरबी जास्त असते, तेव्हा ऍब्सवर चरबीचा एक थर येतो ज्यामुळे ते दिसत नाहीत. ज्यांना एब्स बनवायचे आहेत ते व्यायाम देखील करतात. अलीकडेच, 55 वर्षीय महिला क्लिनिकल सायंटिस्ट आणि पर्सनल ट्रेनर ज्यांच्याकडे 6 पॅक ॲब्स आहेत, तिने तिच्या वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केला आहे.
55 वर्षीय महिलेने बनवले 6 पॅक ॲब्स
क्लिनिकल सायंटिस्ट आणि पर्सनल ट्रेनर ॲन बॅरंटे यांनी फिट ओव्हर 50 #Over50 या हॅशटॅगखाली एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 55 वर्षीय महिलेनेही तिचे ऍब्स दाखवले. एका व्यक्तीने व्हिडीओवर ट्रेनर बॅरंटे यांना विचारले, 'मॅम, मी 25 वर्षांचा आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा चांगले दिसत आहात. मी तुमच्याकडून खूप प्रेरित आहे. मला एब्स बनवायचे आहेत, मी काय करू?'
View this post on Instagram
व्हिडिओ केला शेअर
ट्रेनर बॅरंटेने त्या व्यक्तीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती बसून काही व्यायाम करत आहे. या व्हिडिओमध्ये ती बॉलवर बसून सायकल क्रंच एक्सरसाइज करत असल्याचे दिसत आहे. या व्यायामाद्वारे स्नायूंना प्रशिक्षण दिले जाते.
View this post on Instagram
दुसऱ्या व्यायामात ट्रेनर बॅरंटेने हातात डंबेल घेतला आणि समोर धरला. यानंतर, त्याला प्रथम उजवीकडून डावीकडे आणि नंतर वरपासून खालपर्यंत हलविण्यात आले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डंबेलचे वजन घेऊ शकता. योग्य स्थिती पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पाहा.
View this post on Instagram
तिसऱ्या व्यायामात प्रशिक्षक बरंते यांनी पाय वाढवण्याचा व्यायाम केला. पायाची स्थिती सांभाळून हा व्यायाम कसा करावा हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Woman Health : मासिक पाळी येण्यास उशीर का होतो? पाळी चुकते? असे का होते? 5 कारणे जाणून घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )