Hair Care : चमकदार केसांसाठी ट्राय करा हे हेअर मास्क; जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
Hair Care : जाणून घेऊयात हेअर मास्क तयार करण्याची सोपी पद्धत-
Hair Care : अनेकांना केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे इत्यादी समस्या असतात. यासाठी लोक पार्लरमध्ये जाऊन स्पा करतात. प्रदुषण आणि केसांची निगा न राखणं या कारणांमुळे केस गळतीला सामोरे जावे लागते. केमिकल्स असलेल्या शॅम्पूचा वापर केल्याने केस डॅमेज होण्याची शक्यता असते. घरात असलेल्या काही गोष्टींने तुम्ही स्वत: केसांसाठी हेअर मास्क तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी हेअर मास्क तयार करण्याची सोपी पद्धत-
मास्क तयार करण्याची सोपी पद्धत
हेअर मास्क तयार करण्यासाठी एक वाटीमध्ये नारळाचं तेल. ते तीस सेकंद गरम करा. दुसऱ्या वाटीमध्ये शिया बटर घ्या आणि ते गरम करून मेल्ट करा. नारळाचे तेल आणि शिया बटर हे मिक्स करून घ्या. ही पोस्ट मिक्स केल्यानंतर हा पॅक केसांना लावा. त्यानंतर एक तास केसांवर हा पॅक ठेवा. एक तास झाल्यानंतर कोमट पाण्यानं केसं धुवा.
फायदे
शिया बटरमध्ये मॉयश्चरायजिंग तत्व असते. ज्यामुळे केस कोरडे होत नाहित. तसेच यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सीडेंट आणि पोषक तत्वे आहेत. त्यामुळे आठवड्यामधून दोन वेळा हा हेअर मास्क तुम्ही लावू शकता.
सारखे केससारखे धुवू नका
थंडीमध्ये केससारखे धुवू नका. सारखे केस धुतल्याने केसांमधील नॅचरल ऑइल (Natural Oil) निघून जाते. त्यामुळे केस कोरडे होतात. केस अठवड्यातून दोन वेळाच धुवावेत. केस धुताना कंडिश्नरचा वापर करा. त्यामुळे केस मॉयश्चराइझ होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :