Happy Republic Day 2025 Wishes In Marathi: 26 जानेवारी निमित्त देशभक्तीपर शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवा, दिवस होईल संस्मरणीय!
Happy Republic Day 2025 Wishes In Marathi: 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी, कुटुंबीयांना आणि मित्रांना प्रजासत्ताक दिनाचे संदेश आणि कोट पाठवा
Happy Republic Day 2025 Wishes In Marathi: दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 2025 चा प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारी या वेळी रविवारी येत आहे. याच दिवशी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्य, एकात्मता आणि राष्ट्रीय भावनेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी, लोक त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना 26 जानेवारीचे शुभेच्छा संदेश आणि कोट पाठवतात. अशावेळी, प्रजासत्ताक दिनाच्या या खास प्रसंगी तुम्हालाही तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मेसेज आणि कोट्स पाठवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
प्रजासत्ताक दिन 2025 शुभेच्छा संदेश
या आपण नतमस्तक होऊ,
ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे,
नशीबवान आहे हे रक्त,
जे देशाच्या कामी आलं आहे,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे…
मान नेहमी वर उंच ठेवा
जो पर्यंत प्राण आहे…
जय हिन्द, जय भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बलसागर भारत व्हावे,
विश्वात शोभूनी राहावे,
भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी
हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यांनी भारतदेश घडविला
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा देश
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने
स्वातंत्र्य मिळाले आहे,
म्हणून त्याचे रक्षण
करण्याची शपथ घेऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र
बनविण्यासाठी कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्त आमचे आकाश सारे झुलती
हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण भारतीय आहोत
याचा नेहमीच अभिमान असायला हवा
कारण या अद्भुत देशात जन्म घेण्याचा सन्मान
आणि विशेषाधिकार प्रत्येकाला मिळत नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपल्या देशाचा सुवर्ण वारसा लक्षात ठेवूया
भारताचा एक भाग असल्याचा अभिमान वाटू द्या.
प्रजासत्ताक दिन 2025 च्या खूप खूप शुभेच्छा!
हेही वाचा>>>
Republic Day 2025 Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वात सोपं, उत्तम भाषण! तयारी करा पटापट, प्रेक्षकांकडून होईल टाळ्यांचा कडकडाट
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )