Happy New Year 2024 : आपण साजरा करतो पण 'हे' पाच देश 1 जानेवारीला नवं वर्ष सेलिब्रेट करत नाही
Happy New Year 2024 : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, उत्सवाचे वातावरण असते आणि अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते.
Happy New Year 2024 : संपूर्ण जग सध्या नवीन वर्षाच्या (Happy New Year) आगमनाची वाट पाहतंय. येत्या काही तासांतच 2023 ला निरोप देऊन आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. असं म्हणतात की, नवीन वर्ष नवीन आशा, नवीन नाती आणि नवीन संधी घेऊन येतं. यामुळेच लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश एकमेकांना पाठवतात. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताच्या शेजारी असे अनेक देश आहेत जे 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करत नाहीत.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, उत्सवाचं वातावरण असतं आणि अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन देखील केले जाते. खरंतर, नवीन वर्ष 1 जानेवारीला ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार साजरे केले जाते आणि हे कॅलेंडर जगभरात प्रचलित आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या देशांमध्ये 1 जानेवारीच्या दिवशी नवीन वर्ष साजरे केले जात नाही.
सौदी अरेबिया (Saudi Arabia)
सौदी अरेबिया आणि यूएईसह बहुतेक देश इस्लामिक कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करतात. इस्लामिक नवीन वर्षाची तारीख किंवा रास अस-सनह अल-हिजरिया दरवर्षी बदलते. असे मानले जाते की, या दिवशी प्रेषित मोहम्मद मक्का येथून मदिना येथे स्थलांतरित झाले.
चीन (China)
चीनमध्ये केवळ चंद्रावर आधारित कॅलेंडर मानले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चीनमध्ये दर तीन वर्षांनी नवं वर्ष हे सूर्याच्या आधारित कॅलेंडरशी जुळले जाते. चीनी नववर्ष 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान येते.
थायलंड (Thailand)
थायलंड हा देश जगभरातील अनेक लोकांच्या आवडीचा देश आहे. पण, थायलंडमध्ये देखील 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरं करत नाही. या ठिकाणी 13 किंवा 14 एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. थाई भाषेत त्याला 'सॉन्गक्रान' म्हणतात. या दिवशी लोक एकमेकांना थंड पाण्याने अंघोळ घालतात.
रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine)
रशिया आणि युक्रेनचे लोकही 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करत नाहीत. या दोन्ही देशांमध्ये नवीन वर्ष: या ठिकाणी 14 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते.
श्रीलंका (Sri Lanka)
श्रीलंकेतही एप्रिलच्या मध्यात नवीन वर्ष साजरा केलं जातं. या ठिकाणी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला अलुथ म्हणतात. या दिवशी पारंपरिक पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करतात.
महत्त्वाच्या बातम्या :
Happy New Year 2024 : 1 जानेवारीलाच का साजरा करतात नवं वर्ष? न्यू ईअरचा इतिहास नेमका काय?