तुमच्या चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या आल्यात का? मग हे उपाय करा...
Tips For Glowing Skin : आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या अवेळी आलेल्या सुरकुत्या देखील नष्ट होतील शिवाय, तुमच्या चेहऱ्यावरील तेजदेखील वाढेल.
Tips For Glowing Skin : तुमच्या चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या आल्यात का? किंवा चेहऱ्यावर डाग, पुरळ आली असल्यास घाबरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला सांगतो काही नैसर्गिक उपाय. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या अवकाळी सुरकुत्या देखील नष्ट होतील शिवाय, तुमच्या चेहऱ्यावरील तेजदेखील वाढेल.
चंदन : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे चंदन. याचा लेप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. यातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणारी बॅक्टेरीया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात. याच्या लेपनामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी कमी करण्यास मदत करतात.
संत्र्याची साल : यातील ' क ' जीवनसत्त्व, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम चेहऱ्यावरील ब्लॅकहेड, मृत पेशी, पुरळ काढून टाकतात.
लिंबू पाणी : लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी तसेच सर्व प्रकारचे डाग नाहीसे होऊन चेहरा नितळ होतो. यातील अॅसिडने चेहऱ्यावरील ऑईल बॅलेन्स करतो.
बेसन आणि मुलतानी माती
मुलतानी माती चेहऱ्यासाठी रामबाण उपाय आहे. चेहऱ्यावर नियमितपणे मुलतानी माती लावल्याने चेहरा नक्कीच तजेलदार होतो. मुलतानी मातीप्रमाणेच बेसन चेहऱ्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यांचे मिश्रण तुमचा चेहरा आणखी सुंदर बनवेल.
दही आणि हळद : हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. हळद आणि दही सुरकुत्याची समस्याही दूर करते. दह्याचा वापर फेस पॅक म्हणून केला जातो, दह्यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
टोमॅटो पेस्ट
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी टोमॅटो पेस्ट हा सर्वात प्रभावी उपाय आहे. टोमॅटोमध्ये खूप पौष्टिक पदार्थ असून त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर आहे. टोमॅटो सूर्याच्या किरणांपासून तुमच्या त्वचेचं रक्षण करते. सूर्याची किरणं तुमच्या त्वचेसाठी खूप घातक ठरू शकतात. टोमॅटोमुळे या घातक किरणांचा त्वचेवरील परिणाम कमी करण्यास मदत होते.
खोबरेल तेल
खोबरेल तेल देखील त्वचेला चमकदार बनवण्यासाठी एक चांगला उपाय आहे. एका अभ्यासानुसार खोबरेल तेलाचा वापर त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून केला जाऊ शकतो. खोबरेल तेल त्वचेला आणि शरीराला थंड ठेवतं तसेच ते शरीरावर जखमा बरे करण्यासाठी देखील उपयोगी आहे.
मध आणि कोरफड
त्वचेवर मध लावल्याने त्वचेचा काळेपणा दूर होतो. त्यामुळे त्वचेच्या समस्यांसारख्या आजारांपासून सुटका मिळते. त्वचेशी संबंधित आजारांशी लढण्यासाठी कोरफडीचा वापर अत्यंत गुणकारी आणि प्रभावी मानला जातो. जखमा भरण्यासोबतच हे त्वचेला मॉइश्चरायझ करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? 'या' गोष्टींपासून दूर राहा, पाहा यादी
- Heart Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )