![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fitness Tips : वयाच्या पन्नाशीतही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहायचंय? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
Fitness Tips : जर तुम्हाला म्हातारपणातही तंदुरुस्त राहायचे असेल आणि आजारांना बळी पडायचे नसेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटनेसकडे लक्ष देणे.
![Fitness Tips : वयाच्या पन्नाशीतही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहायचंय? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा Fitness Tips health habits for physical and mental fitness as we age marathi news Fitness Tips : वयाच्या पन्नाशीतही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहायचंय? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/06beee8def5d1b8e7d05d1899407bdba1703387170736358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fitness Tips : जसजसं आपलं वय वाढत जातं तसतशी अनेक आजार होण्याची शक्यता जास्त असते. वाढत्या वयात अल्झायमर, ऑस्टिओपोरोसिस, मेटाबॉलिक सिंड्रोम यांसारखे डोळ्यांशी संबंधित आजार होण्याचा धोका जास्त असतो. यातील अनेक आजार हे खूप गंभीर असतात, त्यामुळे केवळ रुग्णच नाही तर कुटुंबातील सदस्यही त्रस्त असतात. त्यामुळे जर तुम्हाला वृद्धापकाळातही तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुमच्या फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकता. चला जाणून घेऊयात काय आहेत या सोप्या गोष्टी.
स्ट्रेंथ ट्रेनिंग रूटीन फॉलो करण्यासाठी सोप्या टिप्स :
- धावणे, जॉगिंग किंवा वेगवान चालणे यांसारखे व्यायाम चांगलेच आहेत पण धावणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा, यामुळे शरीर सक्रिय राहते.
- नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
- जर तुम्ही कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खात असाल तर त्यात ऑलिव्ह ऑईल घाला. हे कार्ब्सचा ग्लायसेमिक प्रभाव कमी करते.
- दिवसभरात कोणतेही एक फळ खा.
- ग्रीन टी प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका 25 टक्क्यांनी कमी होतो, त्यामुळे दुधाचा चहा कमी करा आणि एक कप ग्रीन टी प्यायला सुरुवात करा.
- पायऱ्या चढणे हा खूप चांगला व्यायाम आहे, यामुळे कार्डिओ फिटनेस वाढू शकतो.
- जास्त नाही, दररोज फक्त 1 मिनिट स्कॉट्स केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारू शकतो.
- फिटनेस राखण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर झोपही खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे रोज 8 तासांची झोप घ्या.
- जेवताना मोबाईल किंवा टीव्ही बघू नका. यामुळे अनेक वेळा काय खावं हेच कळत नाही, त्यामुळे वजन वाढते. याव्यतिरिक्त, हार्मोन्सची पातळी देखील वाढू शकते.
- चाळीशी ओलांडताच तुमच्या आहारातील पोषणाचे प्रमाण वाढवा. यामुळे तुम्हाला नेहमी थकल्यासारखे वाटणार नाही.
- जर तुम्ही काम करत असाल तर ऑफिसमध्ये बसण्याची पद्धत, मध्ये ब्रेक घेणे, पाणी पिणे यांसारख्या पद्धती फॉलो करा.
- तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सतत हालचाल करा यामुळे तुमचं वजन कमी होईल आणि तंदुरुस्त राहाल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : मधुमेह आणि केस गळण्याबरोबरच लठ्ठपणा देखील आनुवंशिक आहे का? तज्ञांचे मत जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)