Fashion : 160 वर्ष जुन्या साडीपुढे इतर फॅशन फेल! अनंत राधिकाच्या लग्नात आलियाची जादू, 'त्या' साडीची खासियत जाणून घ्या
Fashion :अनंत राधिका अंबानीच्या शाही लग्नात जवळपास संपूर्ण बॉलिवूड पाहायला मिळालं, जिथे अभिनेत्रींची फॅशन आणि पोशाख पाहून जणू एखादी सौंदर्य स्पर्धाच सुरू होती
Fashion : ज्या शाही लग्नाची चर्चा अवघ्या जगात सुरू आहे, असं अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न शुक्रवारी पार पडलं. यावेळी अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पवित्र नात्याची सुरुवात झाली. या भव्य लग्नात जवळपास संपूर्ण बॉलिवूड अवतरल्याचं पाहायला मिळालं, जिथे सुंदर अभिनेत्रींचे पोशाख, त्यांची फॅशन पाहून जणू एखादी सौंदर्य स्पर्धाच सुरू असल्याचं दिसून आलं. कारण प्रत्येक अभिनेत्रीचे एकापेक्षा एक सुंदर ड्रेस, साडी आणि फॅशन ट्रेंड पाहायला मिळाले. यावेळी चर्चेचा विषय तर आलिया भट्टच्या लूकचा होता. कारण आलिया लग्नात खूप सुंदर दिसत होती, तिने जी साडी नेसली होती, ती चक्क 160 वर्ष जुनी होती. काय खासियत आहे या साडीची?
स्टाईलमध्ये आलियाशी स्पर्धा अशक्यच..!
अनंत राधिकाच्या लग्नात आलिया इतकी सुंदर दिसत होती की तिच्या वेगळ्या स्टाइलमुळे ती चर्चेत राहिली. अंबानी वेडिंग फंक्शनमध्ये आलिया साडीत आपली सुंदर स्टाईल दाखवून स्टाईलमध्ये कोणीही तिच्याशी स्पर्धा करू शकत नाही हे दाखवून दिले. अनंत राधिकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलिया भट्ट फुशिया गुलाबी सिल्क साडीमध्ये चमकली.
आलिया भट्टच्या साडीची खासियत काय आहे?
अनंत अंबानींच्या लग्नात आलिया भट्टचा सुंदर लूक दिसला. यावेळी तिने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील फ्युशिया पिंक आशावली सिल्क साडी घातली होती. तर स्टाईल प्रियांका कपाडिया बदानीने केली होती. डाएट सब्यानुसार, गुजरातमध्ये बनवलेली ही 160 वर्षे जुनी साडी आहे. या 9 ग्रेस साडीवर जरी वर्क आहे, या साडीची बॉर्डर 99 टक्के शुद्ध चांदी आणि 6 ग्रॅम सोन्याने बनलेली आहे. आलियाने या साडीला आधुनिक टच देण्यासाठी स्ट्रॅपलेस बस्टीअर ब्लाउज घातले होते.
दागिन्यांची जादू
आलियाने तिचा लूक अधिक आकर्षक दिसण्यासाठी सोन्याचा आणि पाचूचा चोकर नेकलेस घातला होता. कानात झुमके, मांग टिक्का आणि बांगड्याही त्याच्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. तिचे केस बन हेअरस्टाइलमध्ये ठेवून त्यावर गजरा लावला आणि ग्लॉसी मेकअपसह ग्लॅम देखील जोडले. अशा प्रकारे आलियाचा एकंदरीत लूक शोभून दिसत होता.
हेही वाचा>>>
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )