Health Tips : दुधाशिवाय 'या' 5 पदार्थांतून मिळतं भरपूर कॅल्शियम; आजपासूनच आहारात समावेश करा
Health Tips : कॅल्शियमसाठी दूध प्यावे असे अनेकदा सुचवले जाते कारण त्यात सर्वाधिक कॅल्शियम असते. पण, दुधाव्यतिरिक्त अनेक पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर असते.
Health Tips : प्रथिनाप्रमाणे, कॅल्शियम देखील शरीराच्या विकासासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक पोषक आहे. हे हाडे आणि दात मजबूत करण्याचं काम करतात. स्नायूंच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे जेणेकरून स्नायू योग्यरित्या कार्य करतात. इतकेच नाही तर कॅल्शियम हृदयाच्या आरोग्याला चालना देण्याचे काम करते.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कमकुवत आणि वेदनादायक हाडे, कमकुवत दात आणि हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तर, कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढायची? कॅल्शियमसाठी दूध प्यावे असे अनेकदा सुचवले जाते कारण त्यात सर्वाधिक कॅल्शियम असते. पण, दुधाव्यतिरिक्त अनेक पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. हे पदार्थ कोणते ते जाणून घ्या.
1. पनीर
पनीरमध्ये सोडियम, कॅल्शियम, प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन ए यांचा समावेश असलेल्या अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे. पनीरच्या सेवनाने हाडे मजबूत होण्याबरोबरच रक्तदाबही नियंत्रित राहतो. केवळ 100 ग्रॅम पनीरमध्ये 42 टक्के कॅल्शियम असते.
2. बदाम
बदाम हे आरोग्यदायी ड्रायफ्रूट्सपैकी एक आहे. फक्त 30 ग्रॅम बदामामध्ये 76 मिलीग्राम कॅल्शियम असते. कॅल्शियम व्यतिरिक्त बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रथिने देखील भरपूर असतात. बदाम खाल्ल्याने हाडांची ताकद वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि पचनक्रिया सुधारते.
3. दही
रोज दही खाल्ल्याने तुम्हाला कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळू शकते. हे केवळ हाडे मजबूत करत नाही तर प्रोबायोटिक्स देखील प्रदान करतात, जे आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. हाडांसह पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज 1 वाटी दही खाणं गरजेचं आहे. यामधून साधारण 300 मिलीग्राम कॅल्शियम मिळेल.
4. सोयाबीन दूध
जे गाय-म्हशीचे दूध पीत नाहीत त्यांच्यासाठी कॅल्शियम मिळविण्यासाठी सोयाबीन दूध हा एक चांगला पर्याय आहे. लैक्टोज असहिष्णु लोकांसाठी सोया दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे प्रथिने आणि फायबरचा एक उत्तम स्रोत देखील आहे आणि हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यास मदत करू शकते.
5. हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या या पोषकतत्त्वांचे पॉवरहाऊस आहेत. त्यामध्ये केवळ पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी नसून कॅल्शियम देखील असते. या कॅल्शियम समृद्ध भाज्या केवळ रोगप्रतिकारक शक्तीच मजबूत करत नाहीत तर हाडे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून देखील आराम देतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :