एक्स्प्लोर

बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बीड : हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर अखेर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाने याबाबतचे व्हिडिओ दाखवल्यानंतर आणि सोशल मीडियातून हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांचा कार्यकर्ता कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे, बीडचे (beed) नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये असून लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरीत आरोपीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील दहशत आणि बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा समोर आला असून बीडचा बिहार होत असल्याची टीकाही केली जात आहे. राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही बीडसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच, मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला होता. शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता, हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीडमधील दहशत, बीडमधील गुंडागर्दी आणि बीडमधील बंदुकधारी तरुणाईचा प्रश्न जटील बनल्याचं यामुळे समोर आलं आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुक मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण केली होती.

विधानसभा निवडणुकीतही यानेच केली होती मारहाण

विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी कैलास फड याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण केल्याचा व्हिडिओ विधानसभा निवडणुकांच्या काळात चांगलाच व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्राजवळ झालेल्या मारहाणीत कैलास फड याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील परळीच्या नेत्याला मारहाण केली होती. आता, बंदुकीतून गोळी झाडल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तोही व्हिडिओ चर्चेत आला आहे.  

हेही वाचा

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 चा हफ्ता कधी मिळणार? Aditi Tatkare यांचं उत्तर ऐका..Mahayuti Cabinet Minister : शिरसाट ते राणे, मंत्रिपद मिळताच अनेकांकडून अधिकारी फैलावरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
Embed widget