Earth Hour 2022 : ‘अर्थ अवर’ साजरा करण्याचं नेमकं कारण तरी काय? कधी पासून सुरु झाली ‘ही’ मोहीम? जाणून घ्या...
Earth Hour 2022 : ‘अर्थ अवर’ दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. यात अनेक लोक तासभर लाईट्स बंद करून, मेणबत्त्या पेटवून ‘अर्थ अवर’ साजरा करतात.
Earth Hour 2022 : आज (26 मार्च) जगभरात ‘अर्थ अवर 2022’ साजरा केला जात आहे. वास्तविक, हा दिवस वीज बचतीच्या उद्देशाने साजरा केला जातो. ‘अर्थ अवर’ ही वर्ल्ड वाईड फंडची (WWF) मोहीम आहे, ज्याचे उद्दिष्ट लोकांना वीज आणि पर्यावरण संरक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे हे आहे. ‘अर्थ अवर’मध्ये जगभरातील नागरिकांना केवळ एक तास दिवे बंद ठेवण्याचेच नव्हे, तर सौरऊर्जेचा अवलंब करण्याचे आवाहन देखील केले जाते. चला तर, जाणून घेऊया हा दिवस कधी सुरू झाला आणि हा दिवस फक्त मार्चच्या शेवटच्या शनिवारी का साजरा केला जातो...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये 2007पासून ‘अर्थ अवर’ ही मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू ती जगभर प्रसिद्ध झाली. 2008मध्ये, 35 देशांनी ‘अर्थ अवर-डे’ मध्ये भाग घेतला. आता एकूण 178 देश अर्थ अवरमध्ये सामील झाले आहेत.
कधी साजरा केला जातो ‘हा’ दिवस?
‘अर्थ अवर’ दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. यात अनेक लोक तासभर लाईट्स बंद करून, मेणबत्त्या पेटवून ‘अर्थ अवर’ साजरा करतात. आज, 26 मार्च रोजी सगळीकडे अर्थ अवर-डे साजरा केला जात आहे.
‘अर्थ अवर’ आवश्यक का?
‘अर्थ अवर’ म्हणजे नेमकं काय आणि त्यात आपण का सहभागी व्हावे? हा प्रश्न आजही सर्वांना पडतो. या मोहिमेत केवळ एक तास वीज बचत केल्यास फारसा फरक पडणार नाही, असा विचार अनेक लोक करतात. पण, एका दिवसाच्या प्रयत्नातून आणि लोकांच्या एकजुटीतून, ‘वीज वाचवा’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. या मोहिमेतून हवामानातील झपाट्याने होणाऱ्या बदलांची लोकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
हेही वाचा :
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha