Dussehra Ravan Dahan Time 2022 : दसऱ्याच्या दिवशी करतात रावणाचे दहन; 'हा' असेल दहनाचा शुभ मुहूर्त
Dussehra Ravan Dahan Time 2022 : दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकापती रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता.
Dussehra Ravan Dahan Time 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, दसरा (Dussehra) दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी देशभरात साजरा केला जातो. यावर्षी दसरा 5 ऑक्टोबर म्हणजेच (उद्या) साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकापती रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता. म्हणून या सणाला विजयादशमी (Vijayadashami) असे देखील म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते. दसरा सण नेमका का साजरा करतात? तसेच रावण दहनाचा शुभ मुहूर्त काय या संदर्भात माहिती जाणून घ्या.
रावण दहन 2022 चा शुभ मुहूर्त (Dussehra Ravan Dahan Muhurat) :
हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ मुहूर्तानुसार करण्याची प्रथा आहे. रावण दहनदेखील याच प्रथेचा भाग आहे. यावेळी रावण दहन सूर्यास्तानंतर रात्री 8:30 पर्यंत आहे. रावण दहन नेहमीच प्रदोष काळात श्रावण नक्षत्रात केले जाते.
श्रावण नक्षत्र कधी सुरू होतेय?
श्रावण नक्षत्र हे 4 ऑक्टोबर 2022, रात्री 10:51 ते 5 ऑक्टोबर 2022, रात्री 09:15 ते रात्री पर्यंत आहे. नक्षत्र संपल्यानंतर 5 ऑक्टोबरला सूर्यास्तानंतर कधीही रावण दहन करता येऊ शकते.
दसरा का साजरा करतात?
या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करून सत्याचा विजय करण्याची प्रथा आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या दसऱ्याच्या दिवशी एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. या दिवशी काही लोक नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची, सोन्याची खरेदी करतात. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. महाराष्ट्रात घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच, घरोघरी सोनं म्हणून आपट्याची पानं देण्याची प्रथा आहे.
महत्वाच्या बातम्या :