एक्स्प्लोर
Advertisement
या सहा कारणांमुळे झोपताना स्मार्टफोन वापरु नये!
मुंबई : स्मार्टफोन हे आता व्यसन बनलं आहे. फोन हातात नसेल तर अनेकांना अवघडल्यासारखं वाटतं. बऱ्याच जणांना रात्री झोपण्यआधी फोनवर चॅट करण्याची, सर्च करण्याची सवय असते. मात्र झोपण्याच्या किमान एक तास आधी फोन स्वत:पासून दूर ठेवायला हवा, नाहीतर युझरने अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वजन वाढतं
झोपताना स्मार्टफोन वापरल्यास चयापचय क्रियेवर परिणाम होतो, यामुळे वजन वाढतं.
अडचणींवर तोडगा काढण्यास अडथळे
झोपताना फोन वापरल्यास मेंदू थकतो. त्यामुळेच कोणत्याही अडचणीवर तोडगा काढण्यास अडथळे येतात
स्मृतीभंश
झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्यास मेंदूवर ताण पडतो. यामुळे स्मृतीभंश होऊ शकतो.
डोळ्यांवर परिणाम
अंधारात फोनचा वापर केल्यास डोळ्यांवर अतिशय ताण पडतो. त्यामुळे डोळे लाल आणि कमकुवत होण्याची शक्यता अधिक असते.
झोपेत अडथळा
जर तुम्ही फोन जवळ घेऊन झोपत असाल, तर तुमच्या झोपेत अडथळा येऊ शकतो. नोटिफिकेशन आणि फोन व्हायब्रेशन हे झोप पूर्ण न होण्याचं सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे
एकाग्रता कमी होते
रात्री झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्यावर एकाग्रता व्यवस्थित होत नाही. यामुळे लक्ष केंद्रीत होण्यास अडचणी येतता. शिवाय ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement