एक्स्प्लोर

Cucumber Benefits : वजन कमी करणे ते हाडे मजबूत होण्यासाठी गुणकारी ठरेल काकडी! जाणून घ्या अधिक फायदे

Cucumber Health benefits : काकडीत जीवनसत्त्वे ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक त्यात आढळतात. काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

Cucumber Health benefits : उन्हाळा सुरु झाला की, बाजारात काकडी येण्यास सुरुवात होते. कडक उन्हाळ्यात गारेगार काकडी (Cucumber) सहज खाल्ली देखील जाते. या काळात काकडी खावी, कारण काकडी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जीवनसत्त्वे ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक त्यात आढळतात. काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. चला तर मग जाणून घेऊया काकडी खाण्याचे काय फायदे आहेत...

मजबूत हाडे : काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यात व्हिटॅमिन-के खूप जास्त प्रमाणात आढळते. यामुळे हाडांची घनता वाढते आणि हाडे मजबूत होतात.

चांगली त्वचा : काकडी त्वचा आणि केसांसाठी अमृतसारखी आहे. काकडी नियमित खाल्ल्यास केसांची वाढ चांगली होते. यासोबतच त्वचाही चमकदार होते. काकडीचा रस प्यायल्याने त्वचेवरील डाग निघून जातात.

बद्धकोष्ठतेपासून सुटका : काकडीच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. यासोबतच काकडी गॅस आणि अपचन कमी करण्यासही मदत करते.

वजन कमी करणे : काकडी खाल्ल्याने वजन कमी करता येते. कारण काकडीत खूप कमी कॅलरीज असतात. याशिवाय त्यात वजन वाढवणारे घटकही नाहीत. यामध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असते. यामुळे काकडी खाल्ल्यानंतर पोटही भरलेले राहते आणि काहीही खावेसे वाटत नाही.

किडनीची समस्या दूर होते : काकडीत भरपूर पाणी असते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पोटॅशियमसह, ते शरीरातून यूरिक ऍसिड आणि मूत्रपिंडातील अशुद्धता देखील काढून टाकते.

कोलेस्ट्रॉल ठीक राहते : काकडी खाल्ल्यानेही कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राखता येते. त्यात एक घटक असतो, ज्याला आपण स्टेरॉल म्हणतो. या घटकामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलनात राहते.

रक्तदाब नियंत्रित राहतो : काकडी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. यामध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget