Christmas 2022 : ख्रिसमसच्या दिवशीच केक का कापतात? 16 व्या शतकापासून सुरु असलेली ही प्रथा नेमकी काय? वाचा रंजक इतिहास
Christmas Cake History : ख्रिसमसच्या दिवशी केक कापण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरु आहे.
Christmas Cake History : डिसेंबर (December 2022) महिना म्हणजे नाताळ, सुट्टी, आणि सेलिब्रेशन असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. दरवर्षी नाताळचा सण (Christmas) 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक चर्चमध्ये जातात. प्रार्थना करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देत केक खाऊ घालतात. या दिवशी केक कापण्याची परंपरा आहे. पण ही परंपरा नेमकी कुठून आली? याची सुरुवात कशी झाली? आणि पहिल्यांदा कधी केक कापला गेला या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर, या ख्रिसमसच्या निमित्ताने जाणून घ्या रंजक ख्रिसमस केकची रंजक कथा.
ख्रिसमस केकचा इतिहास (History Of Christmas Cake) :
सुरुवातीला ख्रिसमसला केक कापण्याची प्रथा नव्हती. ख्रिसमसच्या दिवशी केक कापण्याची संकल्पना 16 व्या शतकात सुरु झाली. ख्रिसमसच्या दिवशी कधीही केक कापला गेला नव्हता. तेव्हा ब्रेड आणि भाज्या मिसळून एक डिश बनवली जायची ज्याला 'प्लम पुडिंग' असे म्हणायचे. 16व्या शतकात पुडिंग काढून त्यात गव्हाचे पीठ वापरले जात असे. त्यात अंडी, लोणी आणि उकडलेल्या फळांचा प्लम टाकला जात असे. काही लोकांनी हा पदार्थ ओव्हनमध्ये ठेवून तयार केला. त्याचप्रमाणे, हळूहळू या डिशने केकचे रूप धारण केले. आणि तेव्हापासून ख्रिसमला केक कापला जाऊ लागला.
नाताळच्या दिवशी केकला सर्वाधिक मागणी
ख्रिसमसला बनवलेला केक महिनाभर आधीपासून बनवायला लागतो. कारण नाताळच्या दिवशी केकला सर्वाधिक मागणी असते. पण फ्रुट केकला सर्वाधिक मागणी राहते. या केकमध्ये ड्रायफ्रुट्सचे प्रमाण जास्त असते. लोक प्लम केक देखील खरेदी करतात. ख्रिसमच्या दिवशी वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या केकला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.
केकमध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर (Dryfruits Cake) :
ख्रिसमसला बनवलेल्या केकमध्ये ड्रायफ्रूट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कारण ड्रायफ्रूट्स शरीरासाठी चांगले असतात, हेल्दी असतात. यामुळे शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते. केकमध्ये ड्रायफ्रूट्स घातल्याने केकची चव अधिक वाढते. त्यामुळे केकमध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या :