OK Full Form : बोलण्यात प्रत्येक वेळी वापरला जाणारा शब्द म्हणजे 'OK'; पण या शब्दाचा Full Form तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आत्ताच वाचा
OK Full Form : एखाद्या गोष्टीवर आपली संमती व्यक्त करण्यासाठी आपण OK शब्द वापरतो.
OK Full Form : ओके 'OK' हा असा शब्द आहे, जो जवळपास प्रत्येकजण या शब्दाचा वापर करतो. हा शब्द आपण दिवसभरात किती वेळा वापरतो हे अनेकांना माहितही नसतं. आपल्या दैनंदिन जीवनात, फोनवर बोलताना, गप्पा मारताना किंवा एखाद्याशी समोरासमोर संभाषण करताना आपण ओके वापरतो. एखाद्या गोष्टीवर आपली संमती व्यक्त करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट करण्यास 'हो' म्हणण्यासाठी आपण OK शब्द वापरतो. मात्र, अनेकदा वापरल्या जाणाऱ्या या शब्दाचा अर्थ नेमका काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या दोन अक्षरी शब्दात इतके विशेष काय आहे की ते पूर्ण वाक्य बनवते? चला तर मग OK शब्दाचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
OK Full Form : काय आहे OK चा फुल फॉर्म?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘All Correct’ साठी OK हा शब्द वापरला जातो. येथे ‘All Correct’ बदलून “Oll Korrect” केले आहे. त्यामुळेच पूर्ण फॉर्म ‘All Correct’ असला तरी AC या शब्दाऐवजी OK वापरला जात आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की ओके म्हणजे 'ऑल करेक्ट'. मात्र, बरेच लोक ओके ची स्पेलिंग 'Okay' अशी लिहीतात.
OK Full Form; OK चा इतिहास काय?
OK हा एक ग्रीक शब्द आहे. ज्याचा अर्थ सर्व बरोबर असा आहे. जेव्हा आपण दुसऱ्याशी सहमत असतो तेव्हा संभाषणात वापरलेला हा एक अतिशय कॉमन शब्द आहे. चॅटिंगमध्येही OK या शब्दाचा कित्येकदा वापर केला जातो. स्मिथसोनियन मासिकातील एक लेख बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये 1839 साली प्रकाशित झाला होता. या लेखानुसार, OK हा शब्द त्या काळात ऐकायला मिळाला. या लेखात पुढे म्हटले आहे की, त्या काळात इंग्रजी शब्दांना फॅशनेबल बनवण्याचा ट्रेंड चालू होता. म्हणजे शब्द वेगळे बोलले जात होते. हेच कारण आहे की त्यावेळी काही शब्दांचे स्पेलिंग चुकीचे होते, जे त्यांच्या मूळ शब्दांपासून बदलले गेले. ओके या शब्दाच्या बाबतीत देखील तसेच घडले आहे. डॉ. एलेन वॉकर असा दावा करतात की हा शब्द "Oll Korrect" वरून आला आहे. हा लेख 1839 साली बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झाला होता. याशिवाय ओके बद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Camel Flu : कोरोनापेक्षा घातक विषाणूचं सावट; आता कॅमल फ्लूचा धोका, FIFA मुळे जगाची चिंता वाढली