(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chocolate day 2022 : 'चॉकलेट डे' साजरा करून वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा..
Chocolate day 2022 : नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी चॅाकलेट डे आहे प्रेमी युगुलांसाठी खास. कसा ते जाणून घ्या.
Chocolate day 2022 : प्रेमी युगुलांसाठी हा आठवडा खूपच महत्वाचा आहे. हा आठवडा प्रत्येक कपल अगदी आनंदाने साजरा करतात. व्हॅलेंटाईन वीक साजरा केल्याने नात्यातील गोडवाही वाढतो असं म्हणतात. नात्यातला हाच गोडवा टिकवण्यासाठी दरवर्षी 9 फेब्रुवारीला 'चॉकलेट डे' (Chocolate day) साजरा केला जातो.
नात्यांमधील गोडवा वाढवण्यासाठी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. यामध्ये प्रेमी युगुल एकमेकांना चॉकलेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. जर तुम्हाला या आठवड्यात तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करायचं असेल तर त्यासाठी चॅाकलेट नक्की द्या. चॉकलेटने तुमच्या नात्यातला गोडवा नक्कीच वाढेल.
लव्ह लाईफ चांगली राहते :
मिठाईमध्ये चॉकलेट हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. असं म्हणतात, चॉकलेट खाल्ल्याने तुमची लव्ह लाईफ चांगली राहते. तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गोडानेच करतो. शास्त्रज्ञांच्या मते, चॉकलेटमध्ये असलेले थिओब्रोमाईन आणि कॅफीन मेंदूमध्ये एंडोर्फिन तयार करतात. ज्यामुळे मेंदूला आणि मनाला शांती मिळते.
चॉकलेट केक :
चॉकलेट केक हा सर्वांच्या आवडीचा आहे. चॉकलेट हे तुमच्या आरोग्यासाठी तसेच नातेसंबंधासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच तुम्ही चॉकलेट डे साजरा करायला हवा. चॉकलेट केक हा प्रत्येक मुलीसाठी आवडीचा फ्लेवर असतो. त्यामुळे या दिवशी चॉकलेट केकचा पर्याय नक्कीच तुमचा दिवस खास बनवेल.
चॉकलेट खाण्याचे फायदे :
चॉकलेट खाण्याचे अनेक शारीरिक फायदेही आहेत. जसे की, चॉकलेटमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. चॉकलेट खाल्ल्याने मन शांत होते आणि नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत मिळते. हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Propose Day 2022 : प्रपोज डे च्या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला 'या' भेटवस्तू द्या आणि प्रेम व्यक्त करा!
- जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या गुलाबाचे काय आहे महत्त्व?
- Valentine Day 2022 : आजपासून सुरु होतोय व्हॅलेंटाईन वीक, पाहा संपूर्ण यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha