Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यावर बदला 'या' गोष्टी, पुन्हा संसर्ग होण्यापासून होईल बचाव
Coronavirus Update : कोरोनाची वाढती आकडेवारी पुन्हा एकदा देशभरातील लोकांची चिंता वाढवत आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.
Coronavirus Update : पुन्हा एकदा कोरोनाची वाढती आकडेवारी देशभरातील लोकांची चिंता वाढवत आहे. यामुळे आपण काय करावे आणि काय करू नये याची देखील काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत, कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर तुम्ही काय करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे कोरोना विषाणू तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पुन्हा कोरोना संक्रमण होऊ नये. चला जाणून घेऊया.
कोविड-19 संसर्गानंतर लगेच टूथब्रश बदला
कोविड-19 तून बरे झाल्यानंतर टूथब्रश न बदलणे हानिकारक ठरू शकते. हे तुम्हाला तसेच इतरांसाठी हे धोकादायक ठरू शकते. कोरोना विषाणू प्लास्टिकच्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकू शकतो. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी जुना टूथब्रश फेकून द्यावा. असे केल्याने तुम्हाला पुन्हा संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळेलच शिवाय कुटुंबातील इतर सदस्यांचेही संरक्षण होईल.
टूथब्रश व्यतिरिक्त या गोष्टी बदला
टूथब्रश व्यतिरिक्त, संसर्ग टाळण्यासाठी तुमची जीभ क्लीनर फेकून द्या. तसेच, शक्य असल्यास, आपला जुना टॉवेल, रुमाल इत्यादी देखील वापरू नका. आपण दर तीन महिन्यांनी आपला टूथब्रश बदलला पाहिजे. पण कोविडनंतर अजिबात उशीर करू नका आणि लगेच तुमचा टूथब्रश बदला आणि दुसरा ब्रश वापरा. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.
कोविड-19 दरम्यान आणि नंतर तोंडाची स्वच्छता कशी राखावी
दात घासण्यापूर्वी हात चांगले धुवा.
दिवसातून दोनदा जीभ घासून स्वच्छ करा
नियमितपणे माउथवॉश वापरा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- Corona Vaccine : लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या कोरोनातून बरे झाल्यानंतर किती महिन्यांनी घ्यायचा डोस
- Weather Forecast : मुंबई, पुणेसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता
- Priyanka Chopra : गूड न्यूज! अभिनेत्री प्रियांका चोप्रा बनली आई, सरोगसीद्वारे दिला बाळाला जन्म
- Srivalli : तुझी झलक अशरफी! श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनची धूम; पोलीस कॉन्स्टेबलने तयार केलेलं गाणं तुफान व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )