(Source: ECI/ABP News/ABP Majha)
7th September 2022 Important Events : 7 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
7th September 2022 Important Events :
7th September 2022 Important Events : विविध सणावारांचा ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 7 सप्टेंबरचे दिनविशेष.
1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week)
भारतीय जनतेमध्ये पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह पाळला जातो. लोकांना पौष्टिक आणि अनुकूल खाण्याच्या सवयींचे महत्त्व समजावे यासाठी हा आठवडा पाळला जातो.
7 सप्टेंबर - वामन जयंती
पंचांगानुसार, वर्षभरातील तिथींपैकी विशेष महत्त्व प्राप्त झालेली तिथी म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी. विष्णूंच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार असलेल्या वामनाचा जन्म भाद्रपद द्वादशीला झाल्याचे मानले जाते. म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून साजरी केली जाते.
1791 : ब्रिटीश राजवटीला आव्हान देणारे महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जन्मदिन.
राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते. सन 1857 च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले.ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
1822 : भारतीय चिकित्सक, संस्कृत अभ्यासक भाऊ दाजी लाड उर्फ रामकृष्ण विठ्ठल लाड यांचा जन्मदिन.
डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. ज्ञान प्रसारक सभा ही संघटना डॉ भाऊ दाजी लाड यांनी विकसित केली. 1866 मध्ये दादाभाई नौरोजीनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. 1869 मध्ये तिची मुंबई येथे शाखा स्थापन केली. मुंबई शाखेचे अध्यक्ष भाऊ दाजी लाड होते.
1887 : साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय संस्कृत विद्वान आणि महान दार्शनिक संस्कृत-तंत्र अभ्यासक, भारतीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गोपीनाथ कविराज यांचा जन्मदिन.
1906 : ’बँक ऑफ इंडिया’ची स्थापना
बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना 7 सप्टेंबर, इ.स. 1906 रोजी झाली. सन 1969 साली या बँकेचे राष्ट्रीयकरण करून ही बँक सरकारी मालकीची झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या या बँकेच्या 2017 च्या सुरुवातीस 5,100 शाखा होत्या.
1933 : इला रमेश भट्ट यांचा जन्म.
1933 : इला रमेश भट्ट एक सहकारी संघटक, कार्यकर्त्या आणि गांधीवादी आहेत. इला रमेश भट्ट यांनी 1972 मध्ये सेल्फ-एम्प्लॉयड वुमेन्स असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना केली. तिने 1972 ते 1996 या काळात तिच्या सरचिटणीस म्हणून काम केले आणि आता त्या गुजरात विदयापीठाच्या वर्तमान कुलपती आहेत.
1947 : भारतात धार्मिक दंगली
इतिहासातील हा दिवस भारतात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात झालेल्या जातीय दंगलीची सुरुवात म्हणून ओळखला जातो. बर्याच इतिहासकारांचे म्हणणे आहे की, स्वतंत्र भारतातील धार्मिक हिंसाचार हा ब्रिटिश सरकारच्या वसाहती काळातील फूट पाडा आणि राज्य करा या धोरणाचा अवशेष आहे. ज्यामध्ये अधिकाऱ्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांच्या विरोधात ढकलले.
1963 : नीरजा भानोत जन्म.
नीरजा भानोत ही पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील विमानप्रवास सेविका होती. सप्टेंबर 5,1986 रोजी झालेल्या पॅन ॲम 73 विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला. नीरजा भानोत ही एक भारतीय विरांगना होती. तिने 1986 साली जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचविले आणि ते करताना वयाच्या 23 वर्षी ती शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र ही वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली. तिला (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक चक्र मिळालेली नीरजा ही सर्वात तरुण व्यक्ती आहे.
महत्वाच्या बातम्या :