25th July 2022 Important Events : 25 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
25th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 25 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
25th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 25 जुलै राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक आणि संगीतकार तसेच, मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून लोकप्रिय असणारे सुधीर फडके यांचा जन्मदिन. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 25 जुलैचे दिनविशेष.
2007 : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी
1997 : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांची 1995 च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड
1880 : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)
1861 : अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकन कॉंग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
सन 1997 साली इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार जवाहरलाल नेहरूपुरस्काराने गौरविण्यात आलं.
सन 1919 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक आणि संगीतकार तसेच, मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून लोकप्रिय असणारे सुधीर फडके यांचा जन्मदिन.
सन 1975 साली माजी भारतीय केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रमोद महाजन यांचे पुत्र आणि दूरदर्शन कलाकार आणि माजी वैमानिक राहुल प्रमोद महाजन यांचा जन्मदिन.
इ.स. 1880 साली सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि महाराष्ट्रातील स्वदेशी चळवळीचे जनक तसेच, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :