2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
2 July 2022 Important Events : जुलै महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 2 जुलैचे दिनविशेष.
1926 : विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.
विनायक आदिनाथ बुवा हे मराठी भाषेतील विनोदी साहित्यिक होते. ते वि. आ. बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ 1950 मध्ये केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण 150 हून अधिक पुस्तकेत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी विनोदी लेखनाबरोबरच आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे.
1880 : गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा जन्म.
गणेश गोविंद बोडस पण गणपतराव याच नावाने ते ओळखले जात. त्यांचा जन्म शेवगाव (जि. अहमदनगर) येथे झाला. वडील गोविंद विनायक बोडस, हेही गावातील पौराणिक नाटकांत कामे करीत. गणपतरावांचे शिक्षण पुणे येथे मराठी सहा व इंग्रजी दोन इयत्तापर्यंत झाले. शाळेत शिकत असताना ते हौशी नाट्यमंडळातून कामे करु लागले. 1895 साली त्यांनी ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. तेथे त्यांना पहिली काही वर्षे दुय्यम भूमिका विशेषतः स्त्रीभूमिका मिळाल्या. पण हळूहळू त्यांना सौभद्र नाटकात कृष्ण, शारदा नाटकात कांचनभट, मूकनायकात विक्रांत व मानापमानात लक्ष्मीधर अशा महत्त्वाच्या भूमिका मिळत गेल्या.
1862 : नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म
1877 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म
1904 : फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म.
1906 : नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.
1922 : फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.
1925 : काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म.
1930 : अर्जेंटिनाचे 50 वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.
1843 : होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन
होमिओपॅथीचे संस्थापक डॉ.सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनी मधील मिसेन या गावी झाला. डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांना सहा भाषा अवगत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी वैद्यकीय पुस्तकांची भाषांतरे केली. 1779 मध्ये 'स्नायूवाताची कारणे व उपचार' या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पदवी प्राप्त केली. 1780 ते 85 या काळात ते लेखनिक, वैद्यकीय चिटणीस अशी काम करत त्यांनी रसायन शास्त्रावरील पुस्तके भाषांतरित करत असतानाच त्यांनी सुप्रसिद्ध वाईन टेस्ट शोधून काढली आणि 'मर्क्युरीयस झोल्युबिलस हानिमान'नावाचं पाऱ्याचा संयुग देखील शोधलं.
1950 : समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन.
मेहर अली हे भारतातील युवक चळवळीचे नेते, उत्तम वक्ते व स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक होते. त्यांचे कुटुंब मूळचे गुजरातच्या कच्छ संस्थानातील. त्यांचे वडील व्यापारानिमित्त मुंबई व कलकत्ता या शहरांत राहत. यूसुफ यांचा जन्म मुंबईत झाला. पण त्यांचे प्राथमिक शिक्षण कलकत्यात झाले. नंतर त्यांनी सर्व शिक्षण मुंबईतच घेतले. विद्यार्थि दशेतच रस्पूट्यीन क्लब नावाची युवक संघटना मिनू मसानी, उपेंद्र देसाई, के एफ्. नरिमन आदी मित्रांच्या साह्याने त्यांनी स्थापन केली. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून (मुंबई विद्यापीठ) त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर ते एल्एल्. बी झाले पण त्यांच्या युवक चळवळीमुळे त्यांना वकिलीची सनद नाकारण्यात आली. तेव्हा त्यांनी आ. रा. भटांच्या मदतीने बाँम्बे यूथलीगची स्थापना केली. पुढे तिचेच रूपांतर बॉम्बे प्रसिडेन्सी यूथ लीगमध्ये झाले. या लीगने काँग्रेसच्या ध्येयधोरणात बदल करण्याचे ठरवले आणि पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. परिणामतः या लीगचे लोण साऱ्या देशभर पसरले. लीगच्या निवडक चारशे स्वयंसेवकांनी मेहरअलींच्या नेतृत्वाखाली मुंबई बंदरात सायमन कमिशनविरुद्ध निदर्शने केली.
2007 : क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन
सरदेसाई यांनी आंतरविद्यापीठ रोहिंटन बारिया ट्रॉफीमध्ये 1959–60 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 87 च्या सरासरीने 435 धावा केल्या. 1960 मध्ये पुणे येथे पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण केले. नंतर रणजी करंडक स्पर्धेत बॉम्बेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली. 1960-61 मधील ते पाच वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक होते.
1566 : जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन.
1778 : फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन.
1999 : अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन
2011 : कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन.
2013 : कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन.
1961 : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन
महत्वाच्या घटना
1698 : थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले.
1850 : बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
1865 : साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
1940 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
1962 : रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
1972 : पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
1983 : कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
1984 : चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
2001 : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
2002 : स्टीव फॉसेट याने उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.