17th August 2022 Important Events : 17 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
17th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 17 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
17th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 17 ऑगस्ट. आजच्या दिवसाला इतिहास खूप महत्व आहे. आजच्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून औरंगजेबाच्या नजर कैदेतून सुटले. छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. पाश्चात्य दिनदर्शिकेनुसार 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 17 ऑगस्ट दिनविशेष.
1909 : क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म
मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा 20 व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.
मदनलाल धिंग्रा यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व 1906 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.
1949 : भारतीय इतिहासकार लेखक निनाद बेडेकर यांचा जन्म
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गडकिल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. शिवाजीची व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.
1916 : ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म
डॉ. विनायक पेंडसे हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते. स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.
1905 : ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते
शंकर गणेश दाते हे मराठी सूचीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 1800 ते 1950 या दीडशे वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार सूची त्यांनी दोन भागांत तयार करून प्रकाशित केलेली आहे. या दोन्ही खंडांत मिळून 26607 इतक्या मराठी ग्रंथांची नोंद झालेली आहे. मात्र, मराठी ग्रंथसूचीव्यतिरिक्त त्यांनी मराठी लोककथांचेही संकलन केले आणि ग्रंथालयशास्त्रावर पुस्तके लिहीली. त्यांनी भारतीय साहित्याची राष्ट्रीय ग्रंथसूची 1901-1951 भाग तीन या ग्रंथातील मराठी विभागाचे संपादनही केले.
1972 : बांगला देशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म
1970 : अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म
1944: ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म
1941 : भारतीय राजकारणी भीम सिंग यांचा जन्म
1932 : नोबेल पुरस्कार प्राप्त त्रिनिदादी लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म
1926 : चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफचायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म
1893 : हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्टचा वाढदिवस
188 : शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक बाबूराव जगताप यांजा जन्म
1866 : हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म
2005 : हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांजे निधन
1988 : पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन
1924 : ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन
1304 : जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन
महत्वाच्या घटना
2008 : एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.
1999 : तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ 7.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंप. 17 हजार लोक ठार, 44 हजार जण जखमी
1997 : उस्ताद अली अकबर खान यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान
1982 : पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
1953 : नार्कोटिक्स ऍॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
1945 : ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
1836 : रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस ऍक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.
1666 : शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.