परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची मोठी संधी, लवकरात लवकर अर्ज करा, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Bank Recruitment 2024: बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. UCO बँकेत 544 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
Bank Recruitment 2024: तुम्हाला जर बँकेत नोकरी (Bank Job) हवी असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. UCO बँकेत 544 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष म्हणजे उमेदवारांची निवड ही परीक्षेशिवाय केली जाणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 जुलै 2024
UCO बँकेने 500 हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 जुलै 2024 आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 544 पदांची भरती केली जाणार आहे. ही पदे प्रशिक्षणार्थी कार्यक्रमासाठी आहेत. आणि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण करणं गरजेचं
दरम्यान, या जागांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनं करता येतील. यासाठी तुम्हाला UCO बँकेच्या अधिकृत वेबसाइट ucobank.com वर जावे लागेल. येथूनही तपशील जाणून घेता येईल. निवडीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असणं आवश्यक आहे. 20 ते 28 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
निवड झाल्यावर किती मिळणार पगार?
अर्ज करण्यासाठी शुल्क 1000 रुपये ठेवण्यात आलं आहे. तर आरक्षित उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवाराची निवड झाल्यास दरमहा 15000 रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील.
परीक्षा न होता उमेदवारांची बँकेत नोकरीसाठी निवड होणार
दरम्यान, पदवी झालेले जे विद्यार्थ्यी नोकरीच्या शोधात आहेत, अशा उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे या नोकरीसाठी उमेदवारांनी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळं तुम्ही सहज नोकरी मिळवू शकता. नोकरीसाठी तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे. तुमचा अर्ज शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीला बोलावण्यात येणार आहे. त्याआधारे तुमची निवड होणार आहे. त्यामुळं परीक्षा न होता उमेदवारांची बँकेत नोकरीसाठी निवड होणार आहे. त्यामुळं इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहानही करण्यात आलं आहे.
युको बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना 1943 मध्ये झाली होती. 1969 साली या बँकेच राष्ट्रीयीकरण झाले होते. या बँकेचे मुख्यालय सध्या कोलकाता इथं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Dream Job News : मनासारखी नोकरी हवीय? मग आजपासून 'हे' काम करा, तुमचं स्वप्न होईल पूर्ण