एक्स्प्लोर

SSC Recruitment 2024 : SSC भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू, 26 हजारांहून अधिक रिक्त जागा; पद आणि पात्रता, जाणून घ्या सर्व काही

SSC Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोगाने हजारो पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्वरित अर्ज करू शकतात.

SSC Recruitment 2024 : तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात असाल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी एक चांगली नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने SSC GD भर्ती 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. आसाम रायफल्स परीक्षा, 2024 मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), SSF आणि रायफलमन (GD) मध्ये कॉन्स्टेबल (GD) साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार SSC ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची ही नोंदणी प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 रोजी संपणार आहे. तसेच, जर तुम्ही ऑनलाईन शुल्क (Online Fee) भरणार असाल तर ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2024 रोजी आहे.

एकूण 26 हजार 146 पदे भरली जाणार

या भरती मोहिमेत एकूण 26 हजार 146 पदे भरली जाणार आहेत. मोहिमेद्वारे, बीएसएफमध्ये 6174 पदे, सीआयएसएफमध्ये 11025 पदे, सीआरपीएफमध्ये 3337 पदे, एसएसबीमध्ये 635 पदे, आयटीबीपीमध्ये 3189 पदे, एआरमध्ये 1490 पदे आणि एसएसएफमध्ये 296 पदांचा समावेश करण्यात आला आहे.

पात्रता निकष काय असतील?

परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वय मर्यादा किती असावी?

अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे.

अशा प्रकारे निवड होईल

भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), वैद्यकीय परीक्षा आणि दस्तऐवज पडताळणी (Document Checkin) यांचा समावेश असेल. आयोगाकडून संगणक आधारित परीक्षा (CBE) इंग्रजी, हिंदी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल असं सांगण्यात आलं आहे.

एवढी अर्जाची फी भरावी लागणार आहे

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्जाची फी 100 रुपये ठेवण्यात आली आहे. तर महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. BHIM UPI, Net Banking, Visa, MasterCard, Maestro, RuPay क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून फी ऑनलाईन भरली जाऊ शकते. अधिक संबंधित माहितीसाठी, उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संबंधित विषयाच्या संदर्भात अधिक माहिती मिळवू शकतात. 

महत्त्वाच्या बातम्या :

IB ACIO Notification 2023 : जगात धडकी भरवणाऱ्या आयबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता, तारखेपासून ते परीक्षा शुल्कपर्यंत जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget