SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदांवर भरती; पाच हजारहून अधिक रिक्त जागा, झटपट अर्ज करा
SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियानं क्लर्क पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
SBI Recruitment 2022 : तुम्ही नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. ही संधी गमावू नका. सध्या भारतीय स्टेट बॅंकेने (SBI) लिपिक क्लर्क (Clerk) पदांवरील भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत पाच हजारहून अधिक जागांवर भरती करण्यात येणार आहे. एकूण 5008 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 07 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करुन या संधीचा लाभ घ्या, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.
भरती प्रक्रियेतील महत्वाच्या तारखा
- SBI लिपिक भरती 2022 अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 07 सप्टेंबर 2022
- SBI लिपिक भरती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2022
- SBI लिपिक भरती परीक्षा 2022 : नोव्हेंबर 2022
- SBI लिपिक भरती परीक्षा प्रवेशपत्र : 29 ऑक्टोबर 2022
- SBI लिपिक भरती मुख्य परीक्षा : डिसेंबर 2022/ जानेवारी 2022
रिक्त पदांचा तपशील, वाचा सविस्तर
भारतीय स्टेट बँकेने (SBI) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक पदासाठी एकूण 5008 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. यानंतर लखनऊ आणि भोपाळमध्ये भरती केली जाईल. महाराष्ट्र, मुंबई मेट्रो, महाराष्ट्र, अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ येथे लिपिक पदासाठी भरती केली जाईल.
भरती परीक्षा कधी होणार?
भारतीय स्टेट बँक लिपिक भरती परीक्षा 2022 नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. याबाबत अधिसूचना जारी केल जाईल.
SBI लिपिक परीक्षा कशी असेल?
SBI लिपिक परीक्षेत मुलाखतीची फेरी नसते. भारतीय स्टेट बँक लिपिक भरती परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल. सर्वप्रथम सर्व उमेदवारांना प्रिलिम्स परीक्षा म्हणजेच पूर्वपरिक्षा (SBI Prelims Exam 2022) द्यावी लागेल. पूर्वपरिक्षेत निवड झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.