एक्स्प्लोर

SAI Recruitment 2024 : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी मुदत वाढ, आता 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

Sports Authority of India Job : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीअंतर्गत कोच पदांच्या 214 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

Sports Authority of India Vacancy : भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI Recruitment) म्हणजेच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (Sports Authority of India) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आनंदाची बातमी म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाअंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मुदत वाढीमुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची आणखी संधी उपलब्ध झाली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या भरतीमध्ये सामील होण्यासाठी फॉर्म भरलेला नाही आणि या भरतीसाठी पात्र आहेत ते आता वाढीव तारखेपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख आता 14 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर फॉर्म भरा.

SAI Coach Vacancy 2024 : रिक्त जागांचा तपशील

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीअंतर्गत कोच पदांच्या 214 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे उच्च कार्यक्षम प्रशिक्षकाच्या 9 पदांवर, वरिष्ठ प्रशिक्षकाच्या 45 पदांवर, प्रशिक्षकाच्या 43 पदांवर आणि सहाय्यक प्रशिक्षकाच्या 117 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

SAI Coach Vacancy 2024 : महत्त्वाच्या तारखा

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 10 जानेवारी 2024 पासून सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी आता 14 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरती करता येणार आहे. SAI ने 31 जानेवारील 2024 रोजी सुधारित अधिसूचना जारी केली आहे.

SAI Coach Vacancy 2024 : भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • या भरतीमध्ये प्रशिक्षक पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी sportsauthorityofindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
  • आता होमपेजवर APPLY ONLINE जॉब्सच्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. आता नवीन पेजवर दिसेल. 
  • आता तुम्हाला Register a New User पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. 
  • नोंदणीनंतर, उमेदवार विचारलेली माहिती योग्यरित्या भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
  • अर्ज भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

SAI Coach Recruitment 2024 Application Form Direct Link : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्यासाठीच्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा.

SAI Coach Recruitment 2024 : वयोमर्यादा

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरतीमध्ये उच्च कार्यक्षम प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 60 वर्षे, वरिष्ठ प्रशिक्षकासाठी 50 वर्षे, प्रशिक्षकासाठी 45 वर्षे आणि सहायक प्रशिक्षकासाठी 40 वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे 30 जानेवारी 2024 या तारखेपर्यंतचे वय लक्षात घेतलं जाईल. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

NMDC Jobs : बंपर भरती! परीक्षा न देता नोकरीची संधी; अधिक माहितीसाठी सविस्तर बातमी वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Embed widget