(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ONGC Recruitment 2022 : ONGC मध्ये बंपर भरती; संधी सोडू नका, लगेचच करा अर्ज
ONGC Recruitment 2022 : ऑइल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडनं बंपर पदांची भरती जाहीर केली आहे. जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत...
ONGC Recruitment 2022 : ऑइल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने बंपर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ONGC ने 922 नॉन-एक्झिक्युटिव्ह रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर उमेदवारांसाठी या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 मे ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
रिक्त जागांचा तपशील
अधिसूचनेनुसार 922 गैर-कार्यकारी रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाईल. त्यानंतर PST/PET/कौशल्य चाचणी/टायपिंग चाचणी घेतली जाईल.
अर्ज शुल्क
सामान्य / OBC / EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 300 रुपये आहे. तर SC/ST/PWBD/माजी सैनिकांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
ONGC भर्ती 2022: उमेदवारांनी अशा प्रकारे या भरतीसाठी अर्ज करावा
पहिला टप्पा : अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार प्रथम ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com ला भेट द्या.
दुसरा टप्पा : होमपेजवर पुढील करिअर टॅबवर क्लिक करा.
तिसरा टप्पा : आता उमेदवार अर्जाची लिंक तपासा.
चौथा टप्पा : त्यानंतर अर्ज भरा.
पाचवा टप्पा : आता अर्ज फी भरा.
सहावा टप्पा : त्यानंतर उमेदवार फॉर्म सबमिट करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सातवा टप्पा : शेवटी, उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी त्यांच्याकडे ठेवावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : पदवीधरांसाठी उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 223 जागांची भरती, वाचा संपूर्ण माहिती
- PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, आज अर्ज करण्याची शेवटची तारीख
- IOCL Recruitment 2022 : पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी; प्रति माह 50 हजार कमावण्याची संधी, कसा कराल अर्ज?