NFL Recruitment 2023 : NFL मध्ये नोकरीची संधी! अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर
Job Majha : NFL ने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर आहे.
![NFL Recruitment 2023 : NFL मध्ये नोकरीची संधी! अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर nfl recruitment 2023 apply for management trainees posts dec 1 2023 is last to apply vacancy job news NFL Recruitment 2023 : NFL मध्ये नोकरीची संधी! अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/16/b103b49047f72004436b3d4b4477cf4c1700131945217349_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NFL Job Vacancy 2023 : सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा (Job Majha) विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (National Fertilizers Limited) म्हणजेच (NFL) ने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.nationalfertilizers.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 3 डिसेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना त्यांचे अर्ज दुरुस्त करता येतील.
NFL Recruitment 2023 : रिक्त जागा तपशील
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Marketing) पदासाठी 74 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (F&A) पदासाठी 10 रिक्त जागा आहेत आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी - कायदा पदासाठी 4 रिक्त जागा आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच उमेदवारी अर्ज दाखल करा.
NFL Recruitment 2023 : वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि उमेदवारांचे कमाल वय 27 वर्षे असावे.
NFL Recruitment 2023 : अर्ज फी
मॅनेजमेंट ट्रेनी - कायदा (Law), मॅनेजमेंट ट्रेनी - मार्केटिंग (Marketing) आणि मॅनेजमेंट ट्रेनी - एफ अँड ए (F&A) साठी अर्ज फी 700 रुपये आहे.
NFL Recruitment 2023 : अर्ज कसा दाखल करावा?
- सर्वात आधी www.nationalfertilizers.com या अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
- यानंतर Apply लिंकवर क्लिक करा.
- आता संपूर्ण अर्जात आवश्यक माहिती बिनचूक भरा.
- यानंतर अर्जाची फी भरा.
- अर्ज भरल्यानंतर प्रिंट आउट घ्या.
NFL Recruitment 2023 : अर्ज करण्यासाठी थेट लिंक येथे क्लिक करा.
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
MoHFW Recruitment 2023 : दहावी पास उमेदवाराला सरकारी नोकरीची संधी, 1.42 लाख रुपये पगार; सविस्तर वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)