MoHFW Recruitment 2023 : दहावी पास उमेदवाराला सरकारी नोकरीची संधी, 1.42 लाख रुपये पगार; सविस्तर वाचा
MoHFW Recruitment 2023 : आरोग्य मंत्रालयाने अनेक ग्रुप बी आणि सी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करू दाखल शकतात.
Government Job Vacancy : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दहावी पास ते पदव्युत्तर उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गट ब आणि गट क पदांसाठी भरती करण्यात येत आहेत. यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून अर्ज मागवले आहेत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार DGHS च्या अधिकृत वेबसाइट hlldghs.cbtexam.in द्वारे ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. या भरतीसाठीची नोंदणी प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. या भरती मोहिमेद्वारे 487 पदांवर भरती करण्यात येणार आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
MoHFW Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 नोव्हेंबर, 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर, 2023
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर , 2023
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अपेक्षित तारीख : डिसेंबर 2023 चा पहिला आठवडा
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षित तारीख : डिसेंबर 2023 चा दुसरा आठवडा
रँक यादी जाहीर होण्याची अपेक्षित तारीख : डिसेंबर 2023 चा तिसरा आठवडा
MoHFW Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कळविण्यात यावे की या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, ती तुम्ही खाली दिलेल्या अधिसूचनेवरून पाहू शकता.
MoHFW Recruitment 2023 : निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणीचा समावेश असेल. यशस्वी उमेदवारांकडून आवश्यक मूळ पात्रता प्रमाणपत्रे/कागदपत्रे गोळा करणे आणि त्यांची पडताळणी CBE नंतर केली जाईल.
MoHFW Recruitment 2023 : अर्ज फी
अर्जाची फी 600 रुपये आहे. आरक्षणासाठी पात्र महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि PWBD मधील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. BHIM UPI, Net Banking, Visa, MasterCard, Maestro, RuPay क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून फी ऑनलाइन भरली जाऊ शकते.
MoHFW Recruitment 2023 : तुम्हाला किती पगार मिळेल?
- वेतन स्तर-1 : 18,000 ते 56,900 रुपये
- वेतन स्तर-2 : 19,900 ते 63,200 रुपये
- वेतन स्तर-3 : 21,700 ते 69,100 रुपये
- वेतन स्तर-4 : 25,500 ते 81,100 रुपये
- वेतन स्तर-5 : 29,200-92,300 रुपये
- वेतन स्तर-6 : 35,400-1,12,400 रुपये
- वेतन स्तर-7 : 44,900-1,42,400 रुपये
MoHFW Recruitment 2023 : परीक्षेची रचना
- संगणक आधारित परीक्षेत 60 प्रश्नांचा एक पेपर असेल, प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतील.
- परीक्षेसाठी 60 मिनिटांचा कालावधी असेल.
- सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील.
- ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली जाईल.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण निगेटिव्ह मार्किंग असेल.
MoHFW Recruitment 2023 : अर्ज करण्याची प्रक्रिया काय?
- सर्वप्रथम hlldghs.cbtexam.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर Recruitment लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील योग्य प्रकारे भरून अर्ज दाखल करा.
- यानंतर, दिलेल्या सूचनांनुसार फोटो आणि स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- दाखल केलेल्या अर्जाची प्रिंटआऊट घ्या.