Job : मंदीच्या वातावरणातही AI, FMCG, ऑईल अँड गॅसमधील रोजगारामध्ये वाढ: नोकरी जॉबस्पीक
Employment Growth : रोजगाराच्या बाबतील अनुभव असलेल्या उमेदवारांची मागणी अधिक असल्याचं दिसून आलं. या उमेदवारांच्या रोजगारांमध्ये 23 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
![Job : मंदीच्या वातावरणातही AI, FMCG, ऑईल अँड गॅसमधील रोजगारामध्ये वाढ: नोकरी जॉबस्पीक naukri jobspeak report says employment growth in AI FMCG oil and gas despite recession job latest marathi news Job : मंदीच्या वातावरणातही AI, FMCG, ऑईल अँड गॅसमधील रोजगारामध्ये वाढ: नोकरी जॉबस्पीक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/f8602db04cc74b87bbfca422f0536ff61718854816618645_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रोजगाराच्या पातळीवर सध्या मंदीची स्थिती असतानाही मे महिन्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एफएमसीजी आणि ऑईल अँड गॅस या क्षेत्रामधील रोजगारांमध्ये मात्र वाढ झाली आहे. त्याचवेळी आयटी, बीपीओ आणि शिक्षण क्षेत्रातील रोजगारांमध्ये घट झाली आहे. नोकरी जॉबस्पीक इंडेक्सच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.
नोकरी जॉबस्पीक इंडेक्स हा भारतातील व्हाइट कॉलर हायरिंगचा आघाडीचा सूचक एप्रिल च्या तुलनेत मे महिन्यामध्ये 6 टक्क्यांनी वाढला. पण गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थिर राहिला. इंडेक्स मे 2023 च्या तुलनेत 2 टक्क्यांची घट होत 2799 वर राहिला. बहुतांश क्षेत्रांनी मध्यम-एक अंकी वाढीची नोंद केली. पण आयटी, बीपीओ आणि शिक्षण या क्षेत्रांचा इंडेक्स घसरला. प्रमुख क्षेत्रे जसे ऑईल अँड गॅस (14 टक्के), बँकिंग (12 टक्के) आणि एफएमसीजी (17 टक्के) यांनी उत्तम वाढ केली. तर हेल्थकेअर आणि ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी या प्रत्येक क्षेत्राने प्रबळ 8 टक्के वाढीची नोंद केली. लहान शहरांनी प्रमुख महानगरीय क्षेत्रांना मागे टाकण्याची कामगिरी कायम ठेवली आणि वरिष्ठ व्यावसायिकांसाठी मोठी मागणी दिसण्यात आली. ज्यामुळे अनुभवी उमेदवारांसाठी संधींमध्ये उत्तम वार्षिक वाढ झाली.
FMCG :
एफएमसीजी क्षेत्राने वार्षिक 17 टक्के वाढीची नोंद केली आणि स्थिरता व वाढ कायम ठेवली आहे, ज्याचे श्रेय ग्राहकांचे बदलते प्राधान्यक्रम, शहरीकरण आणि ई-कॉमर्स विस्तारीकरण अशा घटकांना जाते. मुंबई व कोलकातामधील हायरिंगमध्ये अनुक्रमे 38 टक्के आणि 25 टक्के वाढ दिसण्यात आली. नाविन्यता, वितरण कार्यक्षमता आणि बाजारपेठ प्रवेशावर लक्ष केंद्रित करण्यासह एफएमसीजी कंपन्या सेल्स, मार्केटिंग, सप्लाय चेन व प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अशा कार्यांमध्ये टॅलेंटची सक्रियपणे नियुक्ती करत आहेत.
AI-ML भूमिकांमध्ये शाश्वत वाढ:
एआय-एमएल टॅलेंटसाठी शाश्वत वाढ दिसण्यात आली आहे. एआय-एमएलमधील रोजगारांमध्ये वार्षिक 37 टक्क्यांची वाढ झाली. त्यामधून कार्यरत कार्यक्षमता, नाविन्यता वितरण आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानामधील विशेष कौशल्य व टॅलेंटप्रती उद्योगाचा विश्वास दिसून येतो.
ऑईल अँड गॅस:
जागतिक ऊर्जा बाजारपेठा आणि सर्वसमावेशक नियामक लँडस्केपमध्ये चढ-उतार असताना देखील ऑईल अँड गॅस आणि ऊर्जा क्षेत्रांनी वार्षिक 14 टक्के वाढ केली आहे. सर्व अनुभव स्तरांवर वाढ निदर्शनास आली असली तरी क्षेत्रात 13 ते 16 वर्षांचा अनुभव असलेल्या व्यावसायिकांसाठी सर्वाधिक मागणी दिसण्यात आली. पायाभूत सुविधा विकास, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि शोध उपक्रमांमध्ये सुरू असलेल्या गुंतवणूकांमुळे या वाढीला चालना मिळाली आहे.
हेल्थकेअर:
हेल्थकेअर क्षेत्राने बेंगळुरू व हैदराबाद अशा मेट्रो शहरांमधील रोजगारामध्ये वार्षिक 8 टक्के वाढीची नोंद केली. फ्रण्टलाइन आरोग्यसेवा व्यावसायिकांपासून संशोधक, प्रशासक व टेक्नॉलॉजिस्ट्सपर्यंत हेल्थकेअर इकोसिस्टमच्या विविध विभागांमध्ये टॅलेंटची वाढती गरज आहे.
विकसित होत असलेले प्रादेशिक लँडस्केप:
मिनी-मेट्रोमधील हायरिंग प्रमुख महानगरीय क्षेत्रांमधील हायरिंगना मागे टाकत आहे. या ट्रेण्डमधून लहान शहरी केंद्रांमधील वाढती आर्थिक क्षमता आणि रोजगार संधी दिसून येतात, ज्याचे श्रेय शहरीकरण, पायाभूत सुविधा विकास आणि आर्थिक क्रियाकलापांचे विकेंद्रीकरण अशा घटकांना जाते. नॉन-मेट्रो शहरे जसे सुरत (वार्षिक +23 टक्के) आणि रायपूर (+22 टक्के) हायरिंग हॉटस्पॉट्स ठरले. तर दिल्ली-एनसीआर, चेन्नई व हैदराबाद अशा मेट्रो शहरांमध्ये स्थिर हायरिंग ट्रेण्ड्स निदर्शनास आले, तसेच पुण्यातील हायरिंग ट्रेण्डमध्ये काहीशी वाढ झाली.
अनुभवी व्यावसायिकांना उच्च मागणी कायम:
अनुभवी व्यावसायिकांसाठी मागणी उच्च राहिली, जेथे कामाचा 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी हायरिंग क्रियाकलापामध्ये 23 टक्क्यांची वाढ निदर्शनास आली. याउलट, फ्रेशर्ससाठी रोजगार बाजारपेठ स्थिर राहिली, ज्यामधून खडतर स्पर्धा आणि विकसित कौशल्य आवश्यकतांदरम्यान एण्ट्री-लेव्हल पोझिशन्स मिळवण्यामध्ये करिअरच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्ये असलेल्या व्यावसायिकांना सामना करावी लागलेली आव्हाने निदर्शनास येतात.
नोकरी डॉटकॉमचे चीफ बिझनेस ऑफिसर डॉ. पवन गोयल म्हणाले, "एआय-एमएल डोमेनमधील सातत्यपूर्ण रोजगारवाढ अत्यंत सकारात्मक आहे आणि त्यामधून निदर्शनास येते की भारतीय अर्थव्यवस्था व तेथील टॅलेंट समूह एआयसंदर्भातील जागतिक टेलविंडशी सुसंगत आहेत. तसेच, मे महिन्यामधील इंडेक्स 2023 च्या बेसच्या 2 टक्क्यांपर्यंत स्थिर राहिले असले तरी बहुतांश नॉन-आयटी क्षेत्रांमध्ये उत्तम वाढ दिसण्यात आली, ज्यामुळे आमच्या रोजगार बाजारपेठेची वैविध्यपूर्ण फूटप्रिंट अधिक दृढ झाली आहे."
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)