एक्स्प्लोर

KVS Recruitment 2022 : सुवर्णसंधी! 'येथे' 13 हजारहून अधिक जागांवर बंपर भरती, आज अर्ज करण्याची शेवटची तारीख, लवकर करा अर्ज

Kendriya Vidyalaya Bharti : यासाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्विकारले जातील. उमेदवारांची निवड लेखी चाचणीच्या आधारे केली जाईल. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Kendriya Vidyalaya Bharti Last Date Today : नोकरीच्या शोधात (Job Vacancy) असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय विद्यालयाच्या भरतीसाठी (KVS - Kendriya Vidyalaya Sangathan) अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. या भरतीअंतर्गत 13 हजारहून अधिक रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेकडून शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून आज अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही नोकरीची सुवर्णसंधी सोडून नका. लगेचच अर्ज करा.

आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आज सोमवारी 26 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज स्विकारले जातील. या बंपर भरतीअंतर्गत तुम्हाला पदांखाली केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये (KVS) नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. या भरतीअंतर्गत PGT, PRT, TGT या पदांच्या एकूण 13404 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहेत.

येथे अर्ज दाखल करा

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार KVS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात. यासाठी, केंद्रीय विद्यालय संघटनेच्या kvsangathan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करा.

रिक्त पदांचा तपशील 

या भरतीअंतर्गत एकूण 13,404 पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 5 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली असून आज 26 डिसेंबर 2022 रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवाराने परीक्षा उत्तीर्ण केल्यावर उमेदवाराला संपूर्ण भारतात पोस्टिंग दिले जाऊ शकते.

एकूण रिक्त पदे - 13,404 पद

  • असिस्टंट कमिश्नर - 52 पद
  • प्राचार्य - 239 पद
  • उप प्राचार्य - 203 पद
  • पोस्ट ग्रेजुएट शिक्षक (पीजीटी) - 1409 पद
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) - 3176 पद
  • प्राथमिक शिक्षक (पीआरटी) - 6414 पद
  • पीआरटी (संगीत) - 303 पद
  • ग्रंथपाल - 355 पद
  • वित्त अधिकारी - 06 पद
  • असिस्टंट इंजीनियर (सिव्हिल) - 02 पद
  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर (एएसओ) - 156 पद
  • सीनियर सेक्रेटेरिअट असिस्टंट (यूडीसी) - 322 पद
  • जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (एलडीसी) - 702 पद
  • हिंदी ट्रान्सलेटर - 11 पद
  • स्टेनोग्राफर ग्रेड- II - 54 पद

कशी असेल निवड प्रक्रिया?

या भरतीअंतर्गत रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी असेल आणि या CBT उत्तीर्ण उमेदवारांची निवड अंतिम मानली जाईल.

शैक्षणिक पात्रता

KVS PRT, TRT आणि TGT या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष वेगवेगळे आहेत. पीआरटी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बारावी उत्तीर्ण आणि डी.एड, जेबीटी, बीएड उत्तीर्ण आणि सीटीईटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. टीआरटी पदासाठी बीएड पदवी आणि सीटीईटी प्रमाणपत्र असलेले पदवीधर अर्ज करू शकतात. तसेच पीजीटी, पोस्ट ग्रॅज्युएशन, बीएड आणि सीटीईटी प्रमाणपत्र आवश्यक आहे. याबाबत अधिकचा तपशील तुम्ही अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.

अर्जाचे शुल्क

उमेदवारांना फी भरणे ऑनलाइन पद्धतीनेच भरावी लागेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, UR, OBC आणि EWS उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PWD उमेदवारांना फीमध्ये सवलत देण्यात आली असून त्यांना फी माफ आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget